भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी PAK पंतप्रधान इम्रान खानची 'काळी' नापाक हरकत

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर देशभर आनंदाने तिरंगा फडकत असताना याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र एक नापाक हरकत केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 07:49 PM IST

भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी PAK पंतप्रधान इम्रान खानची 'काळी' नापाक हरकत

इस्लामाबाद, 15 ऑगस्ट : भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर देशभर आनंदाने तिरंगा फडकत असताना याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र एक नापाक हरकत केली. भारताने जम्मू काश्मीरचं विशेष अस्तित्त्व सांगणारं कलम 370 रद्द केल्याच्या धक्क्यातून अजूनही इम्रान खान सावरलेले नाहीत. त्यांची हडबडलेली अवस्था अजूनही कायम आहे, हे इम्रान खान यांच्या ताज्या कृतीतून दिसून आलं. 15 ऑगस्टच्या दिवशीच इम्रान खान यांनी आपल्या Twitter अकाउंटचा DP काळा केला. पंतप्रधानांची री ओढत पाकिस्तानच्या सर्व सरकारी संस्था आणि इम्रान खान यांचा पीटीआय हा राजकीय पक्ष या सर्वांनीच ट्विटरवर निषेधाचा सूर गडद करण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला आणि सर्वांनी डिस्प्ले इमेज काळी केली.

इम्रान खान यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपण सावध करत असल्याचा इशारा दिला असला, तरी त्यातली भाषा धमकीची आहे.

हे वाचा : मोदींनी कॅश व्यवहारांबद्दल केली मोठी घोषणा; या 9 नियमांचं उल्लंघन झालं तर येईल नोटीस

इम्रान यांनी लिहिलंय की, 'सारं जग IoK मधल्या मुस्लिमांची स्रेब्रेनिका सारखी कत्तल आणि वांशिक हिंसा होताना पाहात राहणार का? मी जगाला सावध करू इच्छितो की, हे असं सुरू राहिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि मुस्लीम देशातला मूलतत्त्ववाद आणि हिंसेची मालिका वाढीस लागेल.'

Loading...

एकीकडे पाकिस्तान सरकार भारत सरकारच्या काश्मीर निर्णयावर सतत नकारात्मक प्रतिक्रिया देत असताना पाकिस्तानमध्ये मात्र अंतर्गत बंडाळी वाढत असल्याचं चित्र आहे.

बलुचिस्तानची स्वातंत्र्याची मागणी तीव्र

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातल्या लोकांनी स्वातंत्र्याची मागणी आणखी जोरदारपणे मांडायला सुरुवात केली आहे.

संबंधित वृत्त - 370 हटवल्यानंतरचा लडाखमधील स्वातंत्र्य दिन; पाहा BJP खासदाराच्या डान्सचा VIDEO

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बलुची नागरिकांनी भारताला शुभेच्छा दिल्या आणि जय हिंद अशा घोषणाही दिल्या असल्याच्या बातम्या आहेत. भारत सरकारने आम्हाला स्वातंत्र्यलढ्यात मदत करावी, अशी बलुची लोकांची मागणी आहे.

SPECIAL REPORT : ब्रह्मनाळमध्ये जिथे बोट उलटली तिथे सापडले लाखो रुपयांचे हार-दागिने!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...