'प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलं आणि मानवी हक्कही नाकारले', मुफ्तींच्या मुलीचं अमित शहांना पत्र

'प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलं आणि मानवी हक्कही नाकारले', मुफ्तींच्या मुलीचं अमित शहांना पत्र

'एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्रदिनाचा सोहळा साजरा करत असताना काश्मिरातील जनतेला मात्र प्राण्यांसारखं पिंजऱ्यात बंद करण्यात आलं आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधील निर्बंधांवरून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हिने सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्रदिनाचा सोहळा साजरा करत असताना काश्मिरातील जनतेला मात्र प्राण्यांसारखं पिंजऱ्यात बंद करण्यात आलं आहे,' असा आरोप इल्तिजा मुफ्ती यांनी केला आहे.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने तिथल्या काही गोष्टींवर निर्बंध आणले होते. यावरूनच इल्तिजा मुफ्ती यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. 'मला कोणत्या कायद्याखाली ताब्यात घेण्यात आलं आणि किती काळासाठी, हे सांगावं,' असं इल्तिजा यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, वातावरणात तणाव निर्माण होऊ नये यासाठी जम्मू काश्मीरमधील निर्बंध अद्याप शिथील करण्यात आलेले नाहीत. अनेक पक्षांचे नेते अजूनही अटकेत आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने एक ऑडिओ मेसेज रिलीज केला आहे.

जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवांची पत्रकार परिषद

370 रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. 'कलम जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच निर्बंध ठेवण्यात आले. काश्मीरच्या 12 जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत झाले आहे. पण काश्मीरचा विकास रोखणं हाच दहशतवाद्यांचा हेतू आहे. काश्मीरमध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही,' अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे.

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2019 03:42 PM IST

ताज्या बातम्या