लडाख, 15 ऑगस्ट: जम्मू-काश्मीरला(Jammu-Kashmir) विशेष अधिकार देणारे कलम 370 हटवण्याबरोबरच लडाखला केंद्र शासित प्रदेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर आज लडाखमध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नमग्याल यांनी 370 हटवण्याचे समर्थन करत लोकसभेत दिलेले भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. नमग्याल यांच्या भाषणाने विरोधकांची बोलतीच बंद झाली होती. त्यांचे भाषण ऐकून पंतप्रधान मोदी देखील प्रभावित झाले होते. मोदींनी नमग्याल यांचे भाषण ट्विटवर शेअर दखील केले होते. 370 कलम हटवताना लडाखमधील नागरिकांची 72 वर्षापासूनची मागणी पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले होते. लडाखची ही मागणी पूर्ण झाल्यानंतरचा येथील नागरिकांनी यंदाचा स्वातंत्र्य दिन वेगळ्याच उत्साहात साजरा केला. यावेळी खासदार नमग्याल यांनी धमाकेदार डान्स देखील केला. त्यांचा हा व्हिडिडो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH BJP MP from Ladakh, Jamyang Tsering Namgyal (in front) dances while celebrating 73rd #IndiaIndependenceDay, in Leh. pic.twitter.com/KkcNoarPPB
— ANI (@ANI) August 15, 2019
भाजपचे खासदार नमग्याल यांनी स्वतंत्र्य दिनी लडाखमधील पारंपारिक नृत्य केले. नमग्याल याचे हे नृत्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लेहमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी तेथील लोकांसोबत डान्स केला. याआधी कलम 370 हटवण्याच्या विधेयकावर जेव्हा लोकसभेत चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी केलेले भाषण तुफान व्हायल झाले होते. आता पुन्हा एकदा नमग्याल यांचा डान्स व्हायरल होत आहे.