मराठी बातम्या /बातम्या /देश /

केचअपच्या बाटलीने चिरला गळा, अमित शाहांच्या दौऱ्यावेळीच जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची हत्या

केचअपच्या बाटलीने चिरला गळा, अमित शाहांच्या दौऱ्यावेळीच जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची हत्या

एच.के. लोहिया (डावीकडे) (फोटो क्रेडिट - PTI)

एच.के. लोहिया (डावीकडे) (फोटो क्रेडिट - PTI)

जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. लोहिया यांची त्यांच्या घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली, त्यांच्या शरीरावर जखमाही पाहायला मिळाल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

श्रीनगर 04 ऑक्टोबर : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. लोहिया यांची त्यांच्या घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली, त्यांच्या शरीरावर जखमाही पाहायला मिळाल्या.

या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. लोहिया यांच्या नोकरानेच खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. नोकर हा जम्मू-काश्मीरमधील रामबनचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहिया यांचा मृतदेह त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत सापडला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याआधी दहशतवादी हल्ला

त्यांचा नोकर यासिर याच्यावर हत्येचा संशय पोलिसांना आहे. डीजीपी दिलबाग सिंग यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, नोकराला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तो सध्या फरार आहे. दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, आरोपीने हेमंत लोहिया यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला.

लोहिया यांना ऑगस्टमध्येच जम्मू-काश्मीरच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली होती. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी लोहिया यांच्या घरी भेट दिली. लोहिया यांच्या शरीरावर भाजलेल्या खुणा होत्या आणि त्यांचा गळा चिरलेला असल्याचं त्यांनी सांगितलं. लोहिया हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

कट की दुर्घटना? जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल पंपावरच प्रवासी बसमध्ये मोठा स्फोट, घटनेचा Live Video

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी झालेल्या प्राथमिक तपासात लोहिया यांची आधी हत्या झाल्याचं समोर आलं आहे. त्यांचा गळा चिरण्यासाठी केचपच्या बाटलीचा वापर करण्यात आला. नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोहिया यांच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांना त्यांच्या खोलीत आग लागल्याचं दिसल्यानंतर त्यांनी गेट तोडून खोलीत प्रवेश केला. खोली आतून बंद होती.

ADGP म्हणाले की, प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचं दिसतं. नोकर फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. लोहिया यांच्या निधनावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोक व्यक्त केला आहे.

एचके लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फोर्स टीआरएफ ही नवीन दहशतवादी संघटना आहे. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या सर्व हल्ल्यांना ते जबाबदार आहेत, ज्यात स्थानिक नसलेल्यांच्या हत्येचा समावेश आहे.

First published:

Tags: Jammu kashmir, Murder news