जाहिरात
मराठी बातम्या / देश / केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याआधी दहशतवादी हल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याआधी दहशतवादी हल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याआधी दहशतवादी हल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याआधी दहशतवादी हल्ला, अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून महत्त्वाची माहिती समोर

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी हा स्फोट झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये काहीच व्यवस्थित चाललेलं नाही, हे दाखवण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला होता. अमित शाह यांच्या दौऱ्यावर दहशतवादी संघटनेची नजर होती. तीन दिवसांमध्ये एका दहशतवाद्याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे, असं जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग यांनी सांगितलं. अमित शाह 4 ऑक्टोबरपासून या भागात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना दिलबाग सिंग म्हणाले, ‘सीमेपलीकडील दहशतवादी आणि त्यांचे म्होरके इथे सगळं ठीक नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हाजेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या दौरा असतो, तेव्हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीला लागतात; पण व्हीआयपी यात्रा किंवा अशाप्रकारचे दौरे ते कधीच रोखू शकणार नाहीत. इथे अजूनही काही दहशतवादी उरले आहेत आणि आमचे ऑपरेशन सुरू आहे.’ पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद अस्लम शेख असं आहे. ‘28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रामनगर बसस्थानकात दोन बसमध्ये आयईडी ठेवल्याची कबुली त्याने दिली. हे कृत्य त्याने पाकिस्तानी हँडलर मोहम्मद अमीन भट उर्फ खुबीब याच्या आदेशावरून केलं. पाकिस्तान आणि त्यांच्या एजन्सी या खोऱ्यात शांतता नांदूच नये, तर कायम अशांतता राहावी, याबद्दल कुरापती करत आहेत, पण आता दिवसेंदिवस गोष्टी चांगल्या होत आहेत आणि परिस्थिती सुधारत आहेत,’ असे दिलबागसिंग यांनी पत्रकारांना सांगितलं. उधमपूरमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटांमागे मोहम्मद अमीन भटचा हात असल्याचं दिलबागसिंग यांनी पुढे सांगितलं. तो पाकिस्तानामध्ये सेटल्ड आहे, त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अस्लम शेख नावाच्या दहशतवाद्याशी संपर्क साधला आणि त्याला ड्रोनद्वारे 3 स्टिकी बॉम्ब आणि 4 आयईडी पुरवले गेले होते. तेच बॉम्ब अस्लम शेखने दोन बसमध्ये ठेवले आणि स्फोट घडवून आणला अशी माहितीही त्यांनी दिली. दुसरीकडे, गृहमंत्री अमित शाह दौऱ्यावर येत असल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सीमा भागांमध्ये होणाऱ्या हालचालींवर सुरक्षा दलं लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात