श्रीनगर 29 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बुधवारी रात्री उशिरा डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका प्रवासी बसमध्ये स्फोट झाला. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा बसमध्ये प्रवासी नव्हते. मात्र, हा स्फोट एवढा जोरदार होता की, जवळ उभा असलेले दोघेजण यात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Mercedes ने केले 2 तुकडे; सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर आलिशान कारचा आणखी एक भयंकर VIDEO
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटामुळे पेट्रोल पंपाचं कोणतंही नुकसान झालं नाही, ही दिलासादायक बाब आहे. अन्यथा मोठा धोका संभवू शकला असता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बसमध्ये झालेल्या स्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पार्क केलेल्या बसमध्ये कसा स्फोट होतो ते पाहू शकता.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बुधवारी रात्री उशिरा डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका प्रवासी बसमध्ये स्फोट झाला. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा बसमध्ये प्रवासी नव्हते pic.twitter.com/n8RNQ5iMmP
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2022
ही बस दररोजच्या प्रवाशांच्या सेवेनंतर याठिकाणी पार्क करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, ही बस दररोज याच ठिकाणी पार्क केली जाते. मात्र, बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक या बसमध्ये स्फोट झाला. सुदैवाने बसमध्ये प्रवाशी नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
बेशुद्ध करुन दिला विजेचा शॉक! प्रियकराच्या मदतीने पतीसोबत भयानक कांड
आता या घटनेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे, की हा काही दहशतवाद्यांचा कट होता की स्फोटामागे आणखी काही कारण होतं? बसच्या मधोमध झालेला हा स्फोट इतका जोरदार होता की बसचा एक भाग पूर्णपणे उडून गेला. या बसशेजारी दुसरी बस उभी होती. त्याचंही किरकोळ नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.