लोकांना वाटलं पुन्हा नोटाबंदी म्हणून बॅंकाबाहेर पैसे काढण्यासाठी लावल्या रांगा

लोकांना वाटलं पुन्हा नोटाबंदी म्हणून बॅंकाबाहेर पैसे काढण्यासाठी लावल्या रांगा

सोमवारी या गावातील बॅंकांमधून सुमारे 1 कोटीपर्यंतची रक्कम काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:

चेन्नई, 23 जानेवारी : RBI च्या या एका निर्णयामुळे लोकांना पुन्हा नोटाबंदीचा अनुभव आला. नोटाबंदीमध्ये 1000 व 500 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पैसे काढण्यासाठी तर काही नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी बॅंकांच्या बाहेर अनेक दिवस रांगेत उभे होते. तशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे लोकांना वाटलं की नोटाबंदी झाली. त्यामुळे लोकांनी पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर रांगा लावल्या.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियांने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे तामिळनाडूतील थोथुकुड्डी या गावात नोटाबंदीसारखी परिस्थिती उद्भवली आहे. RBI च्या नव्या नियमानुसार बॅंक खाते सुरू करण्यासाठी नागरिकांना वेरिफिकेशनसाठी National Population Register (NRP) पत्र देणं आवश्यक आहे. मात्र या परिस्थितीमुळे  थोथुकुड्डी या गावातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या लोकल ब्रांचमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. काही दिवसांपूर्वी या बॅंकसमोर खातेधारकांच्या KYC Verification साठी NRP पत्र स्वीकारले जाईल, असं पोस्टर लावलं होतं. त्यानंतर कायापत्तनमचे शेकडो खातेधारक त्यातही मुस्लीम समाजातील लोकांनी बॅंकेत पैसे काढण्यासाठी रांग लावली.

त्यात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या गावातील अनेक ब्रांचमधील खातेधारकांना गैरसमज झाला आहे. नोटाबंदीच्या काळातही सरकारी निर्णयामुळे लोकांना अनेक दिवस बॅंकासमोर रांगेत उभे राहावे लागले होते. तो  भयावह अनुभव असल्याने लोक बॅंकेकड़ून कोणताही निर्णय आल्यास घाबरुन जातात, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. बॅंक कर्मचारी अगतीक झाले असून त्यांच्यासाठी खातेदारकांची समजूत घालणे अवघड झाले आहे. गेल्या तीन दिवसात कयालपट्टीनम या गावातील बॅंकामधून मोठी रक्कम काढण्यात आली आहे. या खातेधारकांची समजूत काढून त्यांना पुन्हा बॅंकेसोबत जोडता येईल की नाही, याबाबत सांशकता असल्याचे मत बॅंक कर्मचाऱ्याने व्यक्त केले. सोमवारी बॅंकेतून 1 कोटीपर्यंतची रक्कम काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर तोडगा म्हणून आम्ही त्यांच्या समाजाच्या प्रमुखाशी बातचीत करण्यात येणार आहे. बॅंकेतून पैसे काढणाऱ्यांमध्ये अधिकतर मुस्लीम खातेधारकांची नावे आहेत. परिणामी इतर बॅंकांमध्ये KYC Verification साठी NRP पत्राबाबत जाहीर करणे टाळण्यात आले आहे.

याबाबत Central Bank of India चे Public relations सांभाळणारे   आर.एल.नायक म्हणाले की, कयालपट्टीनम या भागात जे घडले ते दूर्भाग्यवत आहे. लोकांमध्ये गैरसमज पसरलेला आहे. जर आधार कार्ड असेल तरी  KYC करता येऊ शकते. जर कोणाकडे Pan Card असेल तर बॅंकेकडून पर्यायी ओळखपत्राची मागणी केली जाईल.

निर्भया प्रकरण : काय आहे दोषींची शेवटची इच्छा, ऐकून तुम्हीही व्हाल अवाक

First published: January 23, 2020, 11:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या