LIVE VIDEO: डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली हजारो लिटर पाण्याची टाकी

LIVE VIDEO: डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली हजारो लिटर पाण्याची टाकी

डोळ्याची पापणी लवताच भलीमोठी पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

  • Share this:

कोलकाता, 23 जानेवारी: डोळ्याची पापणी लवताच भलीमोठी पाण्याची टाकी कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. 21 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भीषण पद्धतीनं ही पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली आहे. दुर्घटनेमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर पत्त्यांचा बंगला जसा एका सेकंदात कोसळतो तसंच काहीस ही टाकी फुटल्याचं पाहायला मिळालं. पाण्याची टाकी फुटल्यानं सभोवतालचा परिसर जलमय झाला होता. तर अनेक गावांसाठी पाणीप्रश्न निर्माण होणार आहे. टाकी कोसळल्यानं पाण्याचं अतोनात नुकसान झालं आहे. बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास हा प्रकार घ़डल्य़ाचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिकाऱ्यांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा-तुमचं बालपण आणि शाळेतल्या दंगामस्तीची होईल आठवण, सेहवागने शेअर केला VIDEO

ही दुर्घटना तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या पाण्याच्या टाकीची तपासणी आणि टागटुजी करण्यात आली नव्हती का असा सवालही उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. ही पाण्याची टाकी दोन वर्षांपूर्वी बांधली असल्याचं तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जर ही टाकी बांधून दोनच वर्ष झाली तर एवढ्या लवकर कोसळली कशी? याचा अर्थ निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं का? यासारखे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा-VIDEO : दोन बायकांच्या बेदम हाणामारीतमध्ये पडला वकील, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2020 09:28 AM IST

ताज्या बातम्या