Home /News /entertainment /

‘माझ्यावरही बलात्कार झाला होता’, 'अर्जुन रेड्डी'च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

‘माझ्यावरही बलात्कार झाला होता’, 'अर्जुन रेड्डी'च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्यानं त्याच्या खासगी आयुष्यातला सर्वात धक्कादायक खुलासा केला आहे.

    मुंबई, 23 जानेवारी : साऊथमधील अर्जुन रेड्डी हा सुपरहिट सिनेमा ठरला होता. या सिनेमाचा हिंदी रिमेक कबीर सिंह सुद्धा बॉक्स ऑफिसवर गाजला. साउथ सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता विजय देवरकोंडा दिसला होता. तर त्याच्या मित्राची भूमिका अभिनेता राहुल रामकृष्णा यानं साकारली होती. पण ही भूमिका एवढी दमदार होती की, विजय एवढाच राहुल सुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आता याच अभिनेत्यानं त्याच्या खासगी आयुष्यातला सर्वात धक्कादायक खुलासा केला आहे. राहुल रामकृष्णानं त्याच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरुन बालपणी त्याच्यावरही बलात्कार झाला होता असा धक्कादायक खुलासा केला. राहुलनं त्याच्या ट्विटरवर लिहिलं, ‘लहान असताना माझ्यावरही बलात्कार झाला होता. पण त्यावेळी मला माहित नव्हतं की मी माझं दुःख कोणासोबत शेअर करावं. मला फक्त एवढंच माहित होतं की हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे.’ कंगनाने टीम इंडियातल्या 'या' क्रिकेटपटूला म्हटलं पंगेबाज याशिवाय राहुलनं आणखी एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘मी माझ्यासोबत घडलेल्या अपराधासोबत जगत आहे. इथे कुठेच कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. फक्त काही काळासाठी सहानुभूती मिळते. त्यामुळे पुरुषांना चांगलं वागण्यासाठी शिकवायला हवं.’ राहुलच्या या ट्वीटवर बऱ्याच युजर्सच्या कमेंट आलेल्या दिसत आहेत. सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यानं एक ट्वीट करत त्यानं सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्यानं लिहिलं, मला अशाप्रकारे सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्या शब्दांनी मला खूप दिलासा मिळाला आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो की, तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा. एखादवेळेस त्यांचं वागणं बदललं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कशी आहे शबाना आझमींची प्रकृती, कुटुंबीयांनी केला खुलासा 'अनुपम खेर म्हणजे जोकर' नसीरुद्दीन यांच्या टीकेवर अनुपम यांचं VIDEO तून उत्तर
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या