मराठी बातम्या /बातम्या /देश /

येत्या काही महिन्यांत फास्टटॅग सक्तीचा होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत

येत्या काही महिन्यांत फास्टटॅग सक्तीचा होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत

फास्टटॅग प्रक्रियेवर काम करत असून रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातप्रवण स्पॉट अपडेट करण्यासाठी एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचंही, गडकरी म्हणाले.

फास्टटॅग प्रक्रियेवर काम करत असून रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातप्रवण स्पॉट अपडेट करण्यासाठी एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचंही, गडकरी म्हणाले.

फास्टटॅग प्रक्रियेवर काम करत असून रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातप्रवण स्पॉट अपडेट करण्यासाठी एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचंही, गडकरी म्हणाले.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : कोरोना विषाणू महामारीमुळे जगभरातील दैनंदिन जीवन, अर्थ व्यवस्था कोलमडल्या होत्या. आता हळूहळू सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला. पण कोरोनाचा रस्ता बांधकाम प्रकल्पांवर कोणताही परिणाम झाला नाही, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी सांगितलं. शुक्रवारी हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2020 मध्ये (Hindustan Times Leadership Summit 2020) सीएनएन-न्यूज 18 चे व्यवस्थापकीय संपादक झक्का जेकब यांच्याशी झालेल्या संवादात नितीन गडकरी म्हणाले, बांधकाम उपकरणं उत्पादकांची क्षमता 80 टक्क्यांनी वाढली आहे.

या कठीण परिस्थितीत बिल्डर आणि ठेकेदारांची परिस्थिती सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचबरोबर या चर्चेत नितीन गडकरी यांनी फास्टटॅग संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांत चार चाकी वाहनांसाठी फास्टटॅग (FASTag) वापरणं बंधनकारक होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही या प्रक्रियेवर काम करत असून रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातप्रवण स्पॉट अपडेट करण्यासाठी एक पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.

(वाचा - स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!)

मागील काही वर्षांमध्ये रस्ते अपघातांमध्ये आणि मृत्युंमध्ये 20 टक्के घट झाली आहे. गडकरी यांनी मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर रस्ते अपघातात मरण पावणाऱ्या नागरिकांचे जीव वाचावेत यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी रस्तांची बांधणी करताना काळजी घेणं, क्रॉसिंगचे विविध पर्याय उपलब्ध करून देणं याचा समावेश असल्याचं त्यांनी या आधीच्या अनेक मुलाखतींतून सांगितलं होतं.

(वाचा - गाड्यांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफर नियमांमध्ये होणार हे मोठे बदल)

सरळ रस्ते तयार करण्याला प्राधान्य -

यावेळी चर्चेत गडकरी म्हणाले, हायवे हे काही ठिकाणी वळणदार असतात. परंतु आम्ही सरळ हायवे तयार करण्याला प्राधान्य देत आहोत. दिल्ली आणि अमृतसरमध्ये ग्रीन हायवे तयार करण्यात येत असून यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर सहा तासांनी कमी होणार आहे. सध्या दिल्लीवरून मेरठला जाण्यासाठी 3 ते 4 तासांचा कालावधी लागतो. पण आता केवळ 45 मिनिटांचा कालावधी लागणार असून प्रत्येक राज्यात अशा पद्धतीची कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

(वाचा -  ola ड्रायव्हर्सकडून अशी होतेय फसवणूक; ग्राहकांकडून घेतलं जातंय डबल भाडं)

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, एनएचएईमध्ये असे लोक आहेत जे प्रक्रिया लवकर सुरू होऊन देत नाहीत. अशा लोकांना एकतर कामे करा किंवा नोकरी सोडा असे मी सांगत असल्याचे देखील गडकरी म्हणाले.

First published:

Tags: Road transport and highways minister