मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

महत्त्वाची बातमी! ola ड्रायव्हर्सकडून अशी होतेय फसवणूक; ग्राहकांकडून घेतलं जातंय डबल भाडं

महत्त्वाची बातमी! ola ड्रायव्हर्सकडून अशी होतेय फसवणूक; ग्राहकांकडून घेतलं जातंय डबल भाडं

कॅबचं भाडं डबल द्यावं लागल्यानंतर प्रवासी ग्राहकांनीही संशय आला. याबद्दल ड्रायव्हरला विचारल्यानंतर, त्याने कस्टमर केयरशी बोलण्याचा सल्ला देत लोकांना टाळण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी याची तक्रारच केली नाही. त्यामुळे ड्रायव्हर्सकडून फसवणूक सुरुच राहिली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke

मुंबई, 27 नोव्हेंबर : 1 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी तीन ओला कॅब चालकांना (Ola Cab Drivers) फसवणूकीच्या आरोपाखाली अटक केली. या ओला कॅब चालकांनी ओला अ‍ॅपमधल्या तांत्रिक बिघाडाचा (ग्लिच) फायदा घेत, प्रवाशांकडून ठरलेल्या ठिकाणापर्यंतचं अंतर वाढवून अधिक भाडं घेतलं होतं. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने आतापर्यंत तीन कॅब चालकांना अटक केली आहे. अटक झालेल्या चालकाने सांगितलं की, ओला अ‍ॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाली होती आणि त्याचा फायदा करायचा होता. जवळपास 40 कॅब चालकांनी अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक केली आहे.

कशी होते फसवणूक -

अ‍ॅपमधल्या बिघाडामुळे, ज्यावेळी गाडी एखाद्या ब्रिज किंवा फ्लायओव्हरच्या खाली असते, त्यावेळी GPS मध्ये ती ब्रिजच्या वर चालताना दाखवली जाते. यावेळी ड्रायव्हर ब्रिजच्या खालील अंतरापर्यंत अ‍ॅपला बंद करायचा आणि ब्रिज क्रॉस केल्यानंतर अ‍ॅप पुन्हा चालू करायचा. यामुळे GPS रीरुट करण्यासाठी नवा रस्ता शोधायचा आणि त्यामुळे अंतर वाढत जातं होतं, तसं भाडंही वाढत होतं.

610 रुपयांऐवजी 1200 रुपये -

चौकशीदरम्यान असं आढळून आलं की, ड्रायव्हर्सनी फसवणूकीसाठी मुंबई एयरपोर्ट ते पनवेल असा रुट निवडला. कारण या रुटवर सर्वाधिक ब्रिज आणि फ्लायओव्हर्स आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांनी सांगितलं की, या फसवणूकीमुळे ग्राहकांना ठरलेल्या भाड्याहून अधिक रक्कम द्यावी लागत होती. पनवेल जाणाऱ्या व्यक्तीला 610 रुपये भरावे लागत असतील, तर फसवणूकीमुळे त्याला 1240 रुपये द्यावे लागत होते.

(वाचा - VIDEO: समुद्रात गुंग होऊन पोहत होता तरुण,बाजुला होता 10 फूट भलामोठा शार्क आणि...)

ग्राहकांकडून तक्रार नाही -

कॅबचं भाडं डबल द्यावं लागल्यानंतर प्रवासी ग्राहकांनीही संशय आला. याबद्दल ड्रायव्हरला विचारल्यानंतर, त्याने कस्टमर केयरशी बोलण्याचा सल्ला देत लोकांना टाळण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी याची तक्रारच केली नाही. त्यामुळे ड्रायव्हर्सकडून फसवणूक सुरुच राहिली. काही प्रकरणं पुढे आल्यानंतर ड्रायव्हरवर दंडही लावण्यात आला, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

(वाचा - पत्नीने फसवणुकीची दिली भयानक शिक्षा; पतीला पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकलं)

मुंबई पोलिसांनी ओलाच्या सिनियर अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंपनी काय पावलं उचलणार याबाबत विचारणा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी याप्रकरणी संपूर्ण चौकशी करत असून अ‍ॅपमध्ये झालेला तांत्रिक बिघाड-ग्लिच कशाप्रकारे दूर होईल यावर प्रयत्न सुरू आहेत.

First published:

Tags: Mumbai police