नवी दिल्ली,ता.28 जून : केंद्र सरकारने काळ्यापैश्याविरूद्ध मोहिम छेडली असताना स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 50 टक्क्यांनी जास्त आहे. स्वित्झरलँडच्या केंद्रीय बँकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती पुढे आली आहे.
गेली तीन वर्ष स्विस बँकेत भारतीयांनी जमा करण्यात येणाऱ्या पैशात घट झाली होती. मात्र आता ही रक्कम 7 जार कोटींवर गेली आहे. 2016 मध्ये भारतीयांच्या पैश्यात मोठी घट होऊन हा पैसा 45 टक्के एवढा कमी झाला होती. ही रक्कम 4 हजार 500 कोटी रूपये एवढी होते. काही वर्षांपूर्वीच भारत आणि स्वित्झलँडमध्ये करार झाला असून माहितीचं आदानप्रदान होणार आहे.
हेही वाचा....
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.