नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : देशातील सर्व पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याबाबत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. याबाबत भारतीय रेल्वेने (Indian Railway) एक परिपत्रक जाहीर केलं आहे. पण गेले काही दिवस माध्यमांतून सातत्याने ट्रेन सुरू होण्याच्या संभाव्य तारखा सांगितल्या जात आहेत. आता 1 एप्रिलला सर्व प्रवासी ट्रेन्स (Passenger Trains) सुरू होतील, असं बोललं जात होतं. नेमकं काय आहे सत्य? रेल्वेने याबाबतीत पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे. ट्रेन सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही तारीख निश्चित किंवा जाहीर केलेली नाही. होळीच्या वेळी वाढणारी मागणी, गरज आणि सध्या असलेली कोरोना संसर्गाची (Corona) सद्यस्थिती हे तपासूनच पुढचा निर्णय घेण्यात येईल. गेल्या काही दिवसात देशातल्या काही भागांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. म्हणूनच सरकारकडून रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला नाही. आगामी होळीच्या सणासाठी रेल्वेला मागणी वाढण्याची शक्यता असून कोरोना स्थिती लक्षात घेऊन 100 टक्के सेवा सुरु करण्यासाठी नियोजन केले जात आहे. यास पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) हिरवा कंदिल मिळू शकतो. परंतु तूर्तास सर्व ट्रेन्स सुरू करण्यासाठी कोणतीही योजना निश्चित केली नसल्याचे म्हटलं आहे. सध्या 65 टक्के ट्रेन्स सुरू रेल्वे ग्रेडनुसार ट्रेन्सच्या संख्येत वाढ करत आहे. देशात पहिल्या टप्प्यात 65 टक्के ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जानेवारीपासून 250 पेक्षा अधिक ट्रेन्स पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. लवकरच अन्य ट्रेन्स सुरु केल्या जातील.
हे देखील वाचा - World Radio Day: पंतप्रधान मोदींनी रेडिओ दिनाच्या दिल्या शुभेच्छा; ‘मन की बात’ चा अनुभव केला शेअर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गत वर्षी लॉकडाउन (Lockdown) दरम्यान सामान्य पॅसेंजर ट्रेन सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर राजधानी ट्रेन्स पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आल्या, त्यापुढील टप्प्यात ग्रेडनुसार ट्रेन्स सुरु झाल्या. सध्या देशभरात केवळ कोविड स्पेशल ट्रेन्स (Covid Special Trains) सुरु आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वेकडून कोणत्याही नव्या ट्रेन्स सोडण्यात आल्या नाहीत. सध्या 300 पेक्षा अधिक स्पेशल मेल/एक्सप्रेस ट्रेन्स धावत आहेत. त्याव्यतरिक्त मुंबईत लोकल (Locals) सुरु करण्यात आल्या आहेत.सध्या सुमारे 95 टक्के लोकल्स धावत आहेत. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर 704 लोकल्स धावत असून त्यातून सुमारे 3.95 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरुन 706 लोकल्स धावत आहेत. प्रवाशांना कमी द्यावी लागेल भाड्याची रक्कम सध्या कोविड स्पेशल ट्रेन्स सुरु आहेत. या ट्रेन्सचे प्रवासी भाडे जास्त आहे. स्थिती अनुकूल राहिली आणि पूर्ण तयारी झाली तर एक्सप्रेस, मेमू, डेमू आणि अन्य लोकल, पॅसेंजर ट्रेन्स लवकरच सुरु होतील. प्रवासी सण, उत्सवांसाठी ट्रेनने आपल्या घरी जाऊ शकतील आणि त्यांना कमी प्रवासी भाडे द्यावे लागेल.