जाहिरात
मराठी बातम्या / देश / World Radio Day: पंतप्रधान मोदींनी रेडिओ दिनाच्या दिल्या शुभेच्छा; ‘मन की बात’ चा अनुभव केला शेअर

World Radio Day: पंतप्रधान मोदींनी रेडिओ दिनाच्या दिल्या शुभेच्छा; ‘मन की बात’ चा अनुभव केला शेअर

World Radio Day: पंतप्रधान मोदींनी रेडिओ दिनाच्या दिल्या शुभेच्छा; ‘मन की बात’ चा अनुभव केला शेअर

World Radio Ray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनानिमित त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा अनुभव देखील सांगितला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: आज ’जागतिक रेडिओ दिनानिमित्त’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओच्या श्रोत्यांना अभिवादन करत रेडिओला ‘ सामाजिक संपर्क’ वाढवण्याच एक विलक्षण माध्यम असं म्हणून संबोधलं आहे. त्याबरोबर त्यांनी आवडीने रेडिओ ऐकणाऱ्या सर्वांनाच जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहते. मोदी म्हणतात की,’ जागतिक रेडिओ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! नवनवीन माहिती आणि संगीताने रेडिओला समृद्ध करणाऱ्या तसेच रेडिओच्या सर्व श्रोत्यांना माझ्याकडून शुभेच्छा. हे एक असं माध्यम आहे जिथे सामाजिक संपर्क अजून जास्त समृद्ध होतात. माझ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्यावेळी मी स्वतः रेडिओचा सकारात्मक अनुभव घेतलेला आहे.’

जाहिरात

रेडिओ हा लोकांपर्यंत जोडलं जाण्यासाठी खूप सोपा आणि उत्तम पर्याय आहे. माहिती मिळवण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी लोक आजही रेडिओचा वापर करतात. 110 वर्षानंतरही रेडिओ हा कुठल्याही दुर्गम भागात सुद्धा लोकांना जोडण्याचे काम अविरतपणे करत आहे.

हे देखील वाचा -  आता इंटरनेटवर पॉर्न सर्च केलं तर खैर नाही, थेट पोलिसांना जाणार मेसेज!

2011 मध्ये युनेस्कोच्या (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) सदस्य राष्ट्रांनी जागतिक रेडिओ दिन जाहीर केला आणि 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय दिन म्हणून दत्तक घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात