Home /News /national /

तज्ज्ञांनी दिला इशारा! Coronavirus च्या साथीचा उच्चांक इतक्यात नाहीच; विस्फोट जुलै किंवा ऑगस्टमध्ये

तज्ज्ञांनी दिला इशारा! Coronavirus च्या साथीचा उच्चांक इतक्यात नाहीच; विस्फोट जुलै किंवा ऑगस्टमध्ये

गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.

24 तासांत देशात 10 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा 2, 97,535 हजारवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातच लाखाच्या घरात रुग्णसंख्या आहे. पण विस्फोट व्हायला वेळ आहे, असा धक्कादायक अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 जून : Coronavirus चा संसर्ग आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वेगाने वाढतो आहे. दररोज नवीन रुग्णांची संख्या नवे उच्चांक गाठते आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात परिस्थिती सर्वात भीषण आहे, कारण महाराष्ट्रात रुग्णसंख्या आत्ताच लाखाच्या घरात पोहोचली आहे आणि दिल्लीही त्याच मार्गावर आहे. पण इतर देशात झालं त्याप्रमाणे हाच आपल्या देशातल्या साथीचा उच्चांक किंवा peak आहे का? तर तज्ज्ञांनी याचं उत्तर नाही असं दिलं आहे. म्हणजे याहूनही मोठ्या संख्येने रुग्णवाढ व्हायची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. देशातल्या रुग्णसंख्येने आज एका दिवसातला नवा उच्चांक गाठला. 10 हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात देशात आढळून आले. हा आपल्या देशातल्या साथीचा उच्चांक आहे का आणि यानंतर इतर देशात रुग्णसंख्या उतरणीला लागली, तसं होऊ शकतं का याविषयी बोलताना दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. ब्योत्रा म्हणाले, "आपल्या देशात अजून साथीचा उच्चांक आलेला नाही. काही देशात Covid-19 ने रुग्णसंख्येचं सर्वोच्च टोक गाठल्यानंतर हळूहळू आलेख खाली येत गेला आहे. भारतात हा आलेख अद्याप चढता आहे. तो इतक्यात सपाट व्हायची शक्यता नाहीय" 12 वर्षांखालच्या मुलांना Corona लस घेतल्याशिवाय शाळा नको यासाठी कोर्टात याचिका एवढ्यात COVID-19 वरची लस (COVID-19 Vaccine) यायची शक्यताही दिसत नसल्याचं दिल्लीतले त्जज्ञ डॉक्टर ब्योत्रा म्हणाले. "कोरोनावरची लस उपलब्ध व्हायला पुढच्या वर्षातले पहिले काही महिने तरी लागतील. भारतात या साथीने आता हातपाय पसरले आहेत. पण अद्याप विस्फोट झालेला नाही. जुलैच्या मध्यावर किंवा शेवटी अथवा ऑगस्टमध्ये Coronavirus साथीचा उद्रेक भारतात व्हायची शक्यता आहे", असे डॉक्टर ब्योत्रा म्हणाले. 24 तासांत देशात 10 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा 2, 97,535 हजारवर पोहोचला आहे. 24 तासांत 396 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 8498 वर पोहोचला आहे. तर 1, 47, 195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास 49.47 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकाडा आतापर्यंत 97 हजार 648 वर पोहोचला आहे. त्यापैकी 46 हजार 78 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. त्याखालोखाल तमिळनाडू, गुजरात, दिल्ली राज्यांचा समावेश आहे. संकलन - अरुंधती अन्य बातम्या बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार, 2 रामबाण औषधींचा शोध आणखी एक भारतीय संस्था Corona वरची लस बनवणार; अमेरिकन कंपनीशी झाला करार भारतीयांना मोठा झटका, अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगणार
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या