बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार; 2 रामबाण औषधींचा शोध

बाबा रामदेव यांनी सांगितला Corona वरचा आयुर्वेदिक उपचार; 2 रामबाण औषधींचा शोध

आयुर्वेदातल्या दोन वनस्पतींचा वापर करून केलेली औषधी Coronavirus वर रामबाण इलाज असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : आयुर्वेदातल्या दोन वनस्पतींचा वापर करून केलेली औषधी Coronavirus वर रामबाण इलाज असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. कोरोनाचा विषाणू शरीरात गेल्यानंतर त्याचा पेशींमधला फैलाव रोखून संसर्ग होऊ नये यासाठी अश्वगंधा (Ashwagandha) आणि गिलोय (Giloy) यांचा उपयोग होऊ शकतो, असं रामदेव बाबांचं म्हणणं आहे.

कोरोनाव्हायरसवर  (COVID-19) कुठली औषधी उपयुक्त ठरू शकते यावर पतंजली औषधालयातर्फे संशोधन सुरू आहे. अश्वगंधा आणि गिलोय यांचा कोरोनावर उपचारांसाठी शंभर टक्के परिणामकारक वापर होऊ शकतो, असा दावा रामदेव बाबांनी केला आहे. शरीरात शिरल्यानंतर कोरोना विषाणू पेशींमध्ये जाऊन अधिकाधिक पेशींना संक्रमित करतो. त्यातून रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला केला जातो. अश्वगंधा आणि गिलोयचा औषध म्हणून वापर केला तर विषाणूचं संक्रमण 100 टक्के थांबू शकतं, असा त्यांचा दावा आहे. बाबा रामदेव यांनी टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, अनेक रुग्णांवर अश्वगंधा आणि गिलोययुक्त औषधांनी उपचार केलेले आहेत. त्यांचा बरं होण्याचा दर 100 टक्के आहे. एकाही रुग्णाचा या उपचारादरम्यान मृत्यू झालेला नाही.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पार पडली महत्त्वाची बैठक, या मुद्द्यांवर झाली चर्चा

पतंजलीच्या प्रयोगशाळेत अजूनही संशोधन सुरू आहे. काही दिवसांतच चित्र आणखी स्पष्ट होईल आणि त्यानंतर पतंजलीचा हा शोध जगापुढे लवकरात लवकर मांडला जाईल, असं रामदेव बाबांनी सांगितलं.

संकलन - अरुंधती

कोरोनाची भीती: थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, मारहाणीत झाला ड्रायव्हरचा मृत्यू

First published: June 11, 2020, 5:45 PM IST

ताज्या बातम्या