भारतीयांना मोठा झटका, अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगणार; ट्रम्प सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भारतीयांना मोठा झटका, अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगणार; ट्रम्प सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

दरवर्षी भारतात आयआयटी करणारे बरेच विद्यार्थी अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहतात. मात्र येत्या काळात त्यांचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जून :  दरवर्षी भारतात आयआयटी करणारे बरेच विद्यार्थी अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहतात. परंतु येत्या काळात हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच -1 बी व्हिसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अमेरिकेबाहेरील कोणीही तेथे काम करू शकत नाही. मात्र ज्यांच्याकडे आधीच हा व्हिसा आहे, त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही.

कोरोनामुळे कोट्यवधी भारतीयांनी नोकर्‍या गमावल्या

इन्फोसिस, विप्रो यांसारख्या भारतातील तंत्रज्ञान कंपन्या केवळ एच -1 बी व्हिसाद्वारे आपल्या कर्मचार्‍यांना अमेरिकेत पाठवतात. ट्रम्प सरकारने नव्या निर्णयाला मान्यता दिल्यास त्यांचा भारतातील हजारो आयटी व्यावसायिकांवर वाईट परिणाम होऊ शकतो. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लाखो भारतीयांनी आधीच नोकऱ्या गमावल्या आहेत. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ ट्रम्प सरकार असा युक्तिवाद करतं आहे की, कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे इतर देशातील लोक इकडे येऊ नयेत आणि अमेरिकेतील नागरिकांना संसर्ग होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. अमेरिकेतील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकन नागरिकांच्या नोकरीच्या हमीसाठी नवीन प्रस्ताव

या प्रकरणात व्हाईट हाऊसचे प्रवक्ते होगन गिडले म्हणाले की, प्रशासन अजूनही या निर्णयाच्या परिणामावर विचार करीत आहे. अमेरिकन नागरिकांच्या नोकरीची हमी देण्यासाठी करिअर तज्ज्ञांनी ही ऑफर तयार केली होती. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

हे वाचा-परीक्षा न घेण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यातील 4 मोठ्या शिक्षण संस्था आल्या पुढे

 

First published: June 12, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading