या ट्विटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, "कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी फक्त मास्क वापरणं आणि तापमानावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. शक्य असल्यास लोकांना घरातूनच ऑफिसचं काम करण्याची मुभा द्यायला हवी, तसंच परीक्षा वगळता शाळा आणि कॉलेजही बंद ठेवावेत, जेणेकरून कोरोनाव्हायरस जास्त पसरणार नाही. कमी लोकं घराबाहेर पडतील आणि परिस्थितीही योग्यरित्या हाताळता येईल" संबंधित - सावधान! पुण्यात 'कोरोना'चे रुग्ण, तुम्हीही होऊ शकता शिकार; असा करा स्वत:चा बचाव दरम्यान पुण्यात कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, तर तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांसाठी 104 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुणेकरांना कोरोना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष आणि राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 यावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. संबंधित - आरोग्यमंत्र्यांना झाला कोरोना; पंतप्रधानांनाही व्हायरसची लागण होण्याची शक्यताTo prevent corona only mask is not enough also till temperature rises enough why can't we let ppl work from home where ever possible n shut schools colleges except exams to avoid spreading ..Less ppl out in numbers less chaos n helpful to handling agencies ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pankaj munde