जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / आरोग्यमंत्र्यांना झाला 'कोरोना'; पंतप्रधानांचंही आरोग्य धोक्यात, व्हायरसची लागण होण्याची शक्यता

आरोग्यमंत्र्यांना झाला 'कोरोना'; पंतप्रधानांचंही आरोग्य धोक्यात, व्हायरसची लागण होण्याची शक्यता

कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तर शाळेतील संसर्ग घालवण्यासाठी आरोग्य विभागाने एक मोहीम सुरू केली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तर शाळेतील संसर्ग घालवण्यासाठी आरोग्य विभागाने एक मोहीम सुरू केली आहे.

ब्रिटनच्या (Britain) आरोग्यमंत्री नदीन डॉरिस (Nadine Dorries) यांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. तर पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनाही विषाणूची लागण होण्याचा धोका आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 11 मार्च – कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत लाखो जणांना विळखा घातला आहे. तर हजारो जणांचा बळी घेतला आला. आता तर आरोग्यमंत्र्यांनाही (Health minister) कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. शिवाय पंतप्रधानांचंही (Prime minister) आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या (Britain) आरोग्यमंत्री नदीन डॉरिस (Nadine Dorries) यांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. संबंधित -  सावधान! पुण्यात ‘कोरोना’चे रुग्ण, तुम्हीही होऊ शकता शिकार; असा करा स्वत:चा बचाव ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांच्याही आरोग्याला धोका आहे. त्यांनाही व्हायरसची लागण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण काही दिवसांपूर्वीच नदीन डॉरिस या पंतप्रधानांना भेटल्या होत्या.

जाहिरात

मंत्र्यांनाच कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने आता ब्रिटनमधील नागरिकांमधील भीती अधिकच वाढली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 26,000 लोकांची तपासणी झाली आहे, त्यापैकी 350 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे 50 रुग्ण झालेत. त्यामध्ये 16 इटालियन नागरिकांचा समावेश आहे. जगभरात एक लाखापेक्षा जास्त लोकांचा या व्हायरसची लागण झाली आहे, तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संबंधित -  मेट्रो, एसी बसमधून प्रवास करताय सावधान ! तुम्हाला होऊ शकतो ‘कोरोना’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात