Home /News /national /

गलवान खोऱ्यात चीनशी दोन हात करताना आलं वीरमरण; 20 शहीदांची नावं जाहीर

गलवान खोऱ्यात चीनशी दोन हात करताना आलं वीरमरण; 20 शहीदांची नावं जाहीर

    नवी दिल्ली, 17 जून : भारत चीन सीमेवर लडाखमधल्या गलवान खोऱ्यात परवा रात्रीपासून सुरू असलेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या बाजूचंही या हिंसक वादात नुकसान झालं आहे. जिवाची बाजी लावून चीनची घुसखोरी आणि उद्दामपणा परतवून लावणाऱ्या 20 सैनिकांची यादी लष्कराने जाहीर केली आहे. या 20 जणांना आलं वीरमरण 1. कर्नल संतोष बाबू, हैदराबाद 2. नौदुराम सोरेन, मयुरभंज 3. सतनाम सिंग, गुरुदासपूर 4. के. पलानी, मदुराई ५. सुनील कुमार, पाटणा ६. बिपुल रॉय, मेरठ ७. दीपक कुमार, रिवा (मध्य प्रदेश) ८. राजेश ओरांग, बिरभूम (प. बंगाल) ९. कुंदनकुमार ओझा, साहिबगंज (उत्तर प्रदेश) १०. गणेश राम, काकेर (छत्तीसगड) ११. चंद्रकांत प्रधान, कन्नमार (ओडिसा) १२. अंकुश, हरमिरपूर १३. गुरविंदर, संगरूर १४. गुरुतेज सिंग, मानसा १५. चंदन कुमार, भोजपूर १६. कुंदन कुमार, सहरसा १७. अमन कुमार, समस्तीपूर १८. जयकिशोर सिंग, वैशाली १९. गणेश हंसदा, सिंहभूम २०.मनदीप सिंग, पतियाळा चीनच्या 65 सैनिकांचा खात्मा भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केलं. अन्य बातम्या चीननं भारताचा कसा केला विश्वासघात? जवानांनी सांगितली गलवान खोऱ्यातली कहाणी विमानाने आलेल्या 'त्या' तरूणीच्या संपर्कात आले होतं 96 जण
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या