चीननं भारताचा कसा केला विश्वासघात? जवानांनी सांगितली गलवान खोऱ्यातली कहाणी

चीननं भारताचा कसा केला विश्वासघात? जवानांनी सांगितली गलवान खोऱ्यातली कहाणी

भारत-चीन सीमारेषेवर झालेल्या हिंसेमुळे तणावाचं वातावरण आहे.

  • Share this:

लडाख, 17 जून : भारत-चीन सीमारेषेवर झालेल्या हिंसेमुळे तणावाचं वातावरण आहे. चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झालेल्या हिंसेत भारताचे 20 जवान शहीद झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या सैनिकांनी लोखंडी रॉड आणि दगडाने जवानांवर हल्ला केला. यामध्ये आतापर्यंत या हल्ल्यात 23 जवान शहीद झाले आहेत. यात 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांचा समावेश आहे.

भारतीय अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ज्या सैनिकांजवळ हत्यार नव्हते अशांचीही निर्घृण हत्या करण्यात आली. तर काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी गलवान नदीत उडी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या 110 जखमी जवानांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा-India-China Rift:500 चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा CAITचा निर्णय,वाचा यादी

भारतीय सैन्यानं सीमारेषेवरील चीनचे तंबू हटवल्यानंतर हा वाद वाढला आणि संघर्षाला सुरुवात झाली. हा चिनी तंबू भारतीय सैन्याने हद्दीत असल्यानं काढून टाकला कारण भारतीय सैन्य अधिकारी हरिंदर सिंग आणि चिनी सैन्य अधिकारी लिन लिऊ यांच्या भेटीनंतर हा तंबू हटवण्याबाबत चर्चा झाली होती. कर्नल बाबूच्या युनिटला हा तंबू हटवण्याचा आदेशही दिला होता.

सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ संभाषण सुरू असताना हा हल्ला करण्यात आला. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि काठीने मारहाण करण्यात आली. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती. चीन सैनिकांनी केलेल्या हल्लाला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी आहेत तर काही जण बेपत्ता असल्याचंही सांगितलं जात आहे.

हे वाचा-देशातील मृतांचा आकडा 12 हजारांच्या घरात, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 17, 2020, 11:28 AM IST

ताज्या बातम्या