भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

बैैठकीमध्ये भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या भारत-चीन सैन्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. 19 जून रोजी त्यांनी तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या बैैठकीमध्ये भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. गलवानच्या खोऱ्यात सोमवारी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा वाद झाला या वादाचं रुपांतर हिंचारात झालं. यामध्ये भारताचे 23 जवान शहीद झाले असून 80 जण जखमी आहेत त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. या हिंसाचारात चीनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात भारतीय सैन्यातील 23 जवान शहीद झाले आहेत तर चीनच्याही अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हा वाद शांततापूर्ण मार्गानं सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू आहेत. 19 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. या बैठकीतील चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 17, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading