अमित गंजू, कानपूर, 17 जून : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) देशभरातील अनेक सेवा पूर्णपणे बंद होत्या. ट्रेन आणि विमानसेवा देखील ठप्प होत्या. मात्र अनलॉक (Unlock) फेजमध्ये विमान प्रवासाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. दिल्ली ते कानपूर आणि कानपूर ते दिल्ली ही विमानसेवा देखील सुरू करण्यात आली आहे. कानपूरमधील अहिरवा विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनींग देखील होत आहे. दरम्यान अहिरवा विमानतळावर आलेल्या एका तरूणीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 10 जून रोजी एक तरूणी दिल्लीहून अहिरवा विमानतळावर पोहोचली आणि तिच्यामध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus) लक्षणे आढळून आल्यामुळे तिला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या तरूणीची 3 दिवसांनी कोरोना चाचणी केल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. एअरपोर्ट ऑथोरिटी स्टाफ आणि अन्य प्रवाशांना ही सूचना मिळताच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्लीमधील विमानाने कानपूरमध्ये पोहोचलेली ही तरूणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने विमानतळ प्रशासन बिथरले आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवासी, स्टाफ आणि सीआयएसएफ जवानांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ प्रशासनाने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रवाशांची यादी सुपूर्द केली आहे. (हे वाचा- चहा विकणाऱ्या तरूणाने लावला बँकेला करोडोंचा चूना, वाचा नेमकं काय घडलं ) दिल्लीहून 10 जून रोजी अहिरवा एअरपोर्टवर आलेल्या .या विमानातून 75 प्रवासी आले होते. यातील एका तरूणीमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याची याची तपासणी 13 जून रोजी करण्यात आली. 15 जून रोजी तिचे रिपोर्ट आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. कारण ती पॉझिटिव्ह निघाली होती. त्यानंतर त्या विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. विमानतळ संचालकांनी अशी माहिती दिली आहे की संक्रमित युवतीशिवाय बाकी प्रवासी, 6 कर्मचारी आणि 16 सीआयएसएफ जवानांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांची यादी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. CISF चे डेप्यूटी एसपी बृजराज यांनी सांगितले की, त्यादिवशी त्यांच्या जेवढा स्टाफ, इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल विमानतळावर उपस्थित होते त्यांची तपासणी करण्यात येईल. ते स्वत:ची देखील तपासणी करून घेणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.