जाहिरात
मराठी बातम्या / देश / आमदाराच्या ड्रायव्हरकडे 1 crore सापडल्याने खळबळ, Income Tax ची छापेमारी

आमदाराच्या ड्रायव्हरकडे 1 crore सापडल्याने खळबळ, Income Tax ची छापेमारी

आमदाराच्या ड्रायव्हरकडे 1 crore सापडल्याने खळबळ, Income Tax ची छापेमारी

Income Tax Raid on MLA’s Driver: एका आमदाराच्या ड्रायव्हरकडे 1 कोटी रुपये सापडल्याने खळबळ उडाली आहे. इन्कम टॅक्सच्या छापेमारीमध्ये ही घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च: इन्कम टॅक्सच्या (Income Tax) छापेमारीमध्ये एका आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरातून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. अण्णाद्रमुकच्या (AIADMK) आमदार के. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे ही रक्कम सापडली. आयकर विभागाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या चालकाचं नाव अलगरासामी (वय 38) असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत. गेली 10 वर्ष अलगरासामी चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची AIADMK चा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या वालासुपत्ती याठिकाणी थंगपंडी (56) आणि कोट्टाइपट्टी मधील आनंद (32) यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांची ही ठिकाणं आहेत.

जाहिरात

एसपी जयाचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या निवासस्थानाजवळ रविवारी रात्री आयकर विभागाने ही छापेमारी केली होती. कोणतेही कागदपत्र किंवा आवश्यक माहितीशिवाय ठेवण्यात आलेले 1 कोटी रुपये यावेळी जप्त करण्यात आले. अलगरासामीकडे 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम जप्त करण्यात आली होती.  500 रुपयांच्या एकूण 20000 नोटा जप्त करण्यात आल्या. (हे वाचा- कारच्या धडकेत रिक्षातील CNG टाकीचा स्फोट, 4 जणं ठार; थरारक LIVE VIDEO आला समोर ) त्रिची इन्कम टॅक्स को-डिरेक्टर मदन कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पथकांनी या तिन्ही साथीदारांच्या घरी छापेपारी केली. इन्कम टॅक्सकडे अशी माहिती आली होती की मतदारांना पैसेवाटप केले जात आहे. अशा काही घटना समोर आल्यानंतर इन्कम टॅक्सने कारवाई करत ही रक्कम जप्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात