मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कारच्या धडकेत रिक्षातील CNG टाकीचा स्फोट, 4 जणं जागीच ठार; थरारक LIVE VIDEO आला समोर

कारच्या धडकेत रिक्षातील CNG टाकीचा स्फोट, 4 जणं जागीच ठार; थरारक LIVE VIDEO आला समोर

LIVE CCTV VIDEO: कर्जत-नेरळ रोडवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

कर्जत, 30 मार्च: कर्जत-नेरळ रोडवर (Karjat Neral Road) कार आणि रिक्षाचा (Car accident) भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली होती. या दुर्घटनेमध्ये एकूण 4 जणांनी आपला जीव गमावला. दरम्यान ही घटना जवळच असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. समोर आलेला (LIVE CCTV VIDEO) भयावह आहे. रिक्षेत बसलेल्या 4 जणांचा या घटनेत जागीच मृत्यू (4 Died in Accident) झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सोमवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कर्जत-नेरळ रोडवर हा अपघात घडला आहे.  डिकसळ येथे हुंदई कार कार आणि रिक्षाची धडक झाली. कार आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कळायच्या आत दोन्ही वाहनांनी पेट घेतला.  अचानक झालेल्या या स्फोटात 2 महिला, 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष असे 4 जण जागीच ठार झाले.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरून जात असताना अचानक रिक्षाचालकाने यूटर्न घेत त्याची रिक्षा हॉस्पिटलकडे वळवली त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव Hyundai कारने असताना मागून जोरात धडक दिली. कारच्या धडकेनंतर  रिक्षातील CNG सिलेंडरचा स्फोट झाला. याठिकाणी तात्काळ मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर दिली जात आहे. अचानक दोन्ही वाहनांनी पेट घेतल्यामुळे मदतीसाठी कुणीही पुढे येऊ शकले नाही. अग्निशमन दलाची गाडी पोहोचली पण तोपर्यंत बरात उशीर झाला होता.

या अपघातात दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहे. रिक्षा ही कल्याण येथील असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: Accident, Cctv, Death, Maharashtra, Major accident, Mumbai, Shocking news