मुंबई 25 ऑगस्ट : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांना पर्यटन आणि मौज मजेसाठी काश्मीरात जायचं असले तर त्यांनी सांगावं त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था मी करतो अशी टीका राऊत यांनी केली. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांना श्रीनगरवरून परत दिल्लीत पाठविण्यात आलं होतं जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या त्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं. नेत्यांचं काश्मीरात जाण्यापेक्षा त्या राज्याची शांतता महत्त्वाची आहे असंही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरला भेट देण्यासाठी राहुल गांधी आणि सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ नुकतच दिल्लीवरून श्रीनगरला गेलं होतं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्यांना श्रीनगवरून आपल्या पावली परत पाठवलं. या शिष्टमंडळात काँग्रेस, कम्युनिष्ट, जेडीएस, डीएमके, राष्ट्रवादी आणि तृणमूल यांच्यासह आणखी काही पक्षाचे नेते होते. मी केवळ झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा.. अभिनेते सयाजी शिंदेंनी दिला असा धक्का संजय राऊत म्हणाले, त्यांना केवळ मौज-मजेसाठी जायचं असले तर तसं सांगा मी पर्यटन विभागाला त्यांची व्यवस्था करायला सांगतो. परिस्थिती बिघडेल असं नेत्यांनी काहीही करू नये. जम्मू आणि काश्मीरातलं कलम 370 हटविल्यानंतर तिथे खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लावण्यात आलंय. फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. तसच माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय.
जनतेची भीती मुख्यमंत्र्यांना.. आम्हाला नाही, धनंजय मुंडेंनी पोलिसांना सुनावलं अरुण जेटलींनी काश्मीरवर लिहिला होता अखेरचा ब्लॉग भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण जेटली हे सोशल मीडियावर सक्रिय होते. याशिवाय निष्णात वकील असलेल्या जेटलींनी ब्लॉगदेखील लिहला आहे. त्यांनी 6 ऑगस्टला शेवटचा ब्लॉग लिहला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी नाही, आता शिवसेनेनं या पक्षालाही लावला सुरुंग; प्रवेशासाठी अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काश्मीरमधील कलम 370 च्या निर्णयाचं स्वागत करताना त्यांनी या प्रश्नावर इतिहासापासून आतापर्यंत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतला. त्यात म्हटलं होतं की, काश्मीरबाबत पंडित नेहरुंनी परिस्थिती समजून घेण्यात चूक केली. त्यांनी शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्यावर विश्वास ठेवून राज्याची जबाबदारी सोपवली. मात्र, 1953 मध्ये त्यांच्या अब्दुल्ला यांच्यावरचा विश्वास कमी झाला आणि अब्दुल्ला यांना तुरुंगात टाकले. नेहरुंच्या नंतर इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्ला यांची सुटका केली आणि काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला.

)







