मी केवळ झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा.. अभिनेते सयाजी शिंदेंनी दिला असा धक्का

मी केवळ झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा.. अभिनेते सयाजी शिंदेंनी दिला असा धक्का

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही.. मात्र झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा असल्याचे मत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

  • Share this:

सुमीत सोनवणे, (प्रतिनिधी)

दौंड, 25 ऑगस्ट- मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही.. मात्र झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा असल्याचे मत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे त्यांनी भरभरून कौतुकही केले आहे. दौंड तालुक्यातील पडवी गावच्या माळरानावर सह्याद्री देवराई आणि एक मित्र एक वृक्ष यांच्या प्रयत्नातून वृक्ष लागवड उपक्रमास सुरूवात झाली. या कार्यक्रमाला सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राज्य शासन अतिशय उत्तम काम करत आहे. ते देशासाठी फायद्याचे आहे. झाडे लावणे हे उपक्रम लोक चळवळीतून उभे करणे फार चांगली बाब आहे. केवळ झाडे लावून न थांबता झाडांचे दरवर्षी वाढदिवस साजरे करायला हवेत, अशी अपेक्षाही सयाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सयाजी शिंदे यांनी सांगितले की, केवळ झाडे लावून न थांबता झाडांचे दरवर्षी वाढदिवस साजरे करायला हवेत, अशी अपेक्षाही सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. झाडे जगवण्यासाठी दरवर्षी या झाडांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण स्वत: येणार आहे. झाडे लावण्यासाठी सयाजी शिंदे यांनी तरुणाईला प्रोत्साहन दिले. आगामी काळात पडवीच्या देवराईत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार असल्याचे सह्याद्री देवराई आणि एक मित्र एक वृक्ष उपक्रमाच्या आयोजकांनी सांगितले.

थर्टी फर्स्ट टाळून सयाजी शिंदेंचं झाडांसाठी श्रमदान

नववर्ष साजरा करताना बहुतांश लोक पार्टी करतात. 2016 मध्ये सयाजी शिंदे यांनी दुष्काळी माण तालुक्यातल्या दिवडी गावाच्या शिवारात लावलेल्या आठ हजार झाडांसाठी श्रमदान करून थर्टी फर्स्टचे साजरा केला होता.

सयाजी शिंदे सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. या संस्थेनं जून महिन्यात आठ हजार झाडे लावली होती. ही झाडं ज्या ठिकाणी लावण्यात आली होती. त्या ठिकाणी परिसरातल्या तरुणांनी आणि शाळकरी मुलांनी एकत्र येत वृक्षारोपण केलेल्या माळरानावर श्रमदान केले. लावलेल्या आठ हजार रोपट्यांच्या भोवती आळी तयार करण्यात आली. परिसरातले गवत काढण्यात आले. फक्त वृक्षारोपण करुन इथली तरुणाई थांबली नाही तर त्यांची काळजी घेण्याचे कामही इथली तरुणाई करतेय. नव्या वर्षाचे स्वागत करताना पार्टी न करता निसर्गाने केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचे काम केले असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली होती.

SPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात?

Published by: Sandip Parolekar
First published: August 25, 2019, 2:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading