काँग्रेस-राष्ट्रवादी नाही, आता शिवसेनेनं या पक्षालाही लावला सुरुंग; प्रवेशासाठी नेते मातोश्रीवर

काँग्रेस-राष्ट्रवादी नाही, आता शिवसेनेनं या पक्षालाही लावला सुरुंग; प्रवेशासाठी नेते मातोश्रीवर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील अनेक नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपला जवळ करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील अनेक नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपला जवळ करत आहेत. त्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बोईसर मतदारसंघात खिंडार पडणार आहे.

'बविआ'चे आमदार विलास तरे यांच्यासोबत  आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना प्रवेशासाठी आमदार विलास तरे आणि जनार्दन पाटील मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही नेते दुपारी दीड वाजता शिवसेनेते प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच विद्यमान आमदाराने पक्ष सोडल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. कारण बोईसर विधानसभा मतदारसंघात आमदार विलास तरे यांची चांगली पकड आहे. तसंच शिवसेनेते प्रवेश करण्याच्या तयारीत असणारे आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील यांचाही स्थानिक मतदारांवर प्रभाव आहे.

दरम्यान, काँग्रेससह राष्ट्रवादीचेही अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आव्हान देताना आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचीच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे.

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

First published: August 25, 2019, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading