जनतेची भीती मुख्यमंत्र्यांना.. आम्हाला नाही, धनंजय मुंडेंनी पोलिसांना सुनावलं

जनतेची भीती मुख्यमंत्र्यांना.. आम्हाला नाही, धनंजय मुंडेंनी पोलिसांना सुनावलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सुरक्षेच्या कारणावरून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना स्थानबद्ध केले जात आहे.

  • Share this:

बीड, 25 ऑगस्ट-शिवस्वराज्यच्या यात्रेमधील मावळ्यांना कोणाची भीती नाही. जनतेची भीती आम्हाला नाही ती भीती मुख्यमंत्र्यांना असेल. सभेला आलेल्या तरुणांना डी झोनमध्ये बसू द्या, अशा शद्बात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना सुनावलं. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज, रविवारी माजलगाव येथे आली असता तरुणांची गर्दी झाली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी स्टेजजवळ तरुणांना जाण्यास मज्जाव केला.

माजलगाव येथील सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलिस सुरक्षेच्या कारणास्तव डी झोनमध्ये कार्यकर्त्यांना बसू दिले नाही. यावेळी कार्यकर्त्यांकडून पोलिसांबद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. हा प्रकार धनंजय मुंडे यांच्या लक्षात येताच तरुणांच्या जथ्याला थांबवत असलेल्या पोलिसांना समोर बोलावून चांगलेच खडसावले. कार्यकर्त्यांना डी झोन परिसरात बसू द्या, अशा सुचना दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सुरक्षेच्या कारणावरून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना स्थानबद्ध केले जात आहे. कै. धर्मा पाटील यांच्या 69 वर्षीय पत्नीलाही स्थानबद्ध करण्यात आले. त्याचा संदर्भ घेत जनतेची भीती तुमच्या मुख्यमंत्र्यांना असेल, आम्हाला नाही. आम्ही जनतेतील नेते आहोत असे सुनावत सभेला येणाऱ्या एकाही माणसाला अडवू नका, अशा सूचना केल्या.

धनंजय मुंडेंच्या लेकीची चर्चा..

अजित पवार यांच्या शेजारी स्टेजवर दिमाखात बसून खासदार अमोल कोल्हे यांना इवलंसं बोट दाखवून या सरकारला आसमान दाखवा, असं तर सांगत नाही ना? ही 'छोटी परी' कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला असावा. पण हो कदाचीत ही छोटी परी असं सांगूही शकते कारण ती धनंजय मुंडे यांची लेक आहे.

झाले असे की, धनंजय मुंडेंचे जोरदार भाषण सुरु होते. त्याच वेळी अमोल कोल्हे शेजारी बसणाऱ्या अजित दादांनी पाठीवर हात ठेवत स्मित हास्य केलेल्या या मुलीची चर्चा मात्र अख्या सभेमध्ये झाली. पहिल्यांदाच परळीमध्ये जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडेंचे कुटुंब देखील हजार होते. यात आई, पत्नी आणि अडीच वर्षाची आदिश्री ही देखील हजार होती. सगळे लोक भाषणात टाळ्या वाजवतात हे पाहिल्यावर तिनंही छोट्या हातांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा सगळे तिच्याकडे पाहत होते.

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परळी शहरातील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत मान्यवर स्टेजवर येण्याआगोदर राष्ट्रवादीच्या गाण्यावर आदिश्रीने मनमुराद आनंद लुटला. मान्यवर आणि नेते मंडळी स्टेजवर येताना धनंजय मुंडेंकडे ती हात करत होती. भाषण सुरु झाल्यावर देखील तिची अल्लड मस्ती सुरूच होती. स्टेजवर आल्याबरोबर खा. कोल्हेंनी पहिल्यांदा तिच्याकडे हातवारे करत पाहिले. नंतर स्टेजवर दादाच्या शेजारी जाऊन बसली. यामुळे संपूर्ण परळीच्या सभेत धनूभाऊंच्या लेकीची चर्चा झाली.

धनंजय मुंडेंना तीन मुली आहेत. सर्वात लहान आदिश्री अवघ्या अडीच वर्षांची आहे. पहिल्यांदाच तिने वडिलांचे आवेशपूर्ण भाषण जाहीर कार्यक्रमात ऐकले.विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता मुंडे कुटुंबातील सर्वच जण कामाला लागले आहेत. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे देखील मतदार संघ पिंजून काढत आहेत. यावेळी धनंजय मुंडेंनी परळीकरांना भावनिक आवाहन केले. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांची लेक आदिश्रीची.

SPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 01:16 PM IST

ताज्या बातम्या