Home /News /national /

20 वर्षानंतर बेळगावात कसं फुललं कमळ? वाचा भाजपच्या विजयाची Inside Story

20 वर्षानंतर बेळगावात कसं फुललं कमळ? वाचा भाजपच्या विजयाची Inside Story

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं मोठा विजय साकारला आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं मोठा विजय साकारला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकच्या (Maharashtra-karnataka) सीमेवर असणाऱ्या मराठी बहुल बेळगाव महापालिका निवडणुकीत (Belgaum Municipal Election) भाजपनं मोठा विजय साकारला आहे.

    बेळगाव, 07 सप्टेंबर: महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या मराठी बहुल बेळगाव महापालिका निवडणुकीत (Belgaum Municipal Election) भाजपनं मोठा विजय साकारला आहे. सोमवारी भाजपनं (BJP) 58 पैकी 35 जागांवर विजय मिळवून निर्विवाद बहूमत मिळवलं आहे. तब्बल 20 वर्षांनी याठिकाणी सत्तापालट झाला आहे. वादग्रस्त सीमाभागातील बेळगावात मराठी वज्रमूठ आणि आंदोलनाची धग कायम ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा (Maharashtra Ekikaran Samiti) याठिकाणी दारूण पराभव झाला आहे. समितीला अवघ्या 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे समितीनं 20 वर्षांची सत्ता गमावली आहे. बेळगाव, निपाणी, खानापूर या सीमाभागाचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं प्रथम नगरपालिका आणि नंतर महापालिकेवर सतत 20 वर्षे निर्विवाद सत्ता मिळवून आंदोलनाची धग कायम ठेवली होती. पण यावेळी भाजपनं बेळगाव महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. कर्नाटकातील भाजपचे पाच मंत्री याठिकाणी तळ ठोकून बसले होते. शिवाय प्रत्येक प्रभागात एक आमदार तळ ठोकून होता, भाजपनं एकजुटीनं हा विजय खेचून आणला आहे. हेही वाचा-'नमाज'च्या खोल्यांवरून झारखंडमध्ये CM सोरेन-BJP आमनेसामने महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपनं प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) याठिकाणी आपले उमेदवार उभे केले नव्हते. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला होता. प्रचाराच्या धामधुमीनंतर शुक्रवारी 3 सप्टेंबर रोजी बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी 58 जागांवर मतदान झालं होतं. विशेष म्हणजे बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या गेल्या. हेही वाचा-'गांधी टोपी' नेहरू घालायचे, महात्मा गांधी नाही; BJP नेत्याचा दावा काँग्रेसला केवळ 10 जांगावर मिळालं यश या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसनं सर्व प्रभागात आपले उमेदवार उभे केले होते. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपला 35 जागांवर तर काँग्रेसला अवघ्या 10 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर बेळगाव महानगर पालिकेतील सत्ताधारी पक्ष महाराष्ट्र एकीकरण पक्षाला या निवडणुकीत केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. पण गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला याठिकाणी 32 जागा जिंकल्या होत्या. पण यंदा समितीत फाटाफूट झाल्यानं पक्षाला याचा मोठा फटका निवडणुकीत बसला आहे. हेही वाचा-'Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच... '; पंतप्रधानांनी केलं अभिनंदन बेळगावात भाजपचे 5 मंत्री होते तळ ठोकून बेळगाव महापालिका जिंकण्यासाठी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपचे 5 मंत्री निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तळ ठोकून बसले होते. तसेच निवडणुकीच्या काळात बेळगावातील प्रत्येक प्रभागात एक आमदार तळ ठोकून होते. भाजपनं आपली सर्व शक्ती एकवटून महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का दिला आहे. हेही वाचा-दिलासा! नवा Variant आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी; तज्ज्ञांचं मत निकालानंतर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख आणि माजी मंत्री एन. डी. पाटील यांनी म्हटलं की, बेळगावच्या निकालामुळे धक्का बसला आहे. मात्र वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी शांततामय आंदोलन अधिक एकजुटीनं लढावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Belgaum, BJP, Karnataka

    पुढील बातम्या