जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'नमाज'च्या खोल्यांवरून झारखंडमध्ये CM सोरेन-BJP आमनेसामने

'नमाज'च्या खोल्यांवरून झारखंडमध्ये CM सोरेन-BJP आमनेसामने

'नमाज'च्या खोल्यांवरून झारखंडमध्ये CM सोरेन-BJP आमनेसामने

सरकारने (Jharkhand Govt) नमाज अदा करण्यासाठी झारखंड विधानसभेत काही खोल्या (CM Soren Alloted Rooms For Namaz) आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याच्या 24 तासांच्या आतच राज्यात या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्‍ली, 6 सप्टेंबर : झारखंड सरकारने (Jharkhand Govt) नमाज अदा करण्यासाठी झारखंड विधानसभेत काही खोल्या (CM Soren Alloted Rooms For Namaj) आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याच्या 24 तासांच्या आतच राज्यात या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आज सकाळी जेव्हा विधानसभेचे  (Jharkhand Assembly) कामकाज सुरू झाले तेव्हा भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांच्याविरोधात मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करत जोरदार टीका केली आहे. त्यामुळे विधानसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. मनात आस्था असेल तर ठिक नाही तर सगळीकडे शत्रुच दिसतात, असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे. विधानसभेचा प्रश्नोत्तराच्या तासाला ते उत्तर देत होते. त्यामुळे आता आक्रमक झालेले विरोधक बघून मुख्यमंत्री सोरेन हे ही काहीसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. कोणत्याही गोष्टीचं समाधान होत नसतं तर त्यासाठी मनात आस्था असावी लागते नाही तर सगळीकडे शत्रुच दिसतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. जाहीर माफी मागा अन्यथा…; नितेश राणेचं जावेद अख्तर यांना अल्टिमेटम आता या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री रघुबर दास (Ex CM Raghubar Das) यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. जर तातडीने हा निर्णय रद्द झाला नाही तर विधानसभेसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. झारखंडमध्ये आता हा नवीनच वाद सुरू झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली आहे. आता हा मुद्दा आणखी किती काळ गाजणार यावरुन विधानसभेच्या सेशनची यशस्वीता अवलंबून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात