अहमदाबाद, 7 सप्टेंबर: भाजप नेत्यानं (BJP Leader) गांधी टोपीवरून वादग्रस्त विधान (Gandhi Cap Controversial Statement) केल्यानंतर देशात नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्यानं 'गांधी टोपी पंडित नेहरू परिधान करायचे, महात्मा गांधी नाही', अशा आशयाचं विधान केल्यानंतर काँग्रेस पक्षानं यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे देशात आता गांधी टोपीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. यावर काँग्रेस पक्षाकडून भाजपवर पलटवार केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, ते आता स्वातंत्र्य सेनानी आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानाला टार्गेट करत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या गुजरात युनिटचे नवनियुक्त सरचिटणीस रत्नाकर यांनी दावा केला की, महात्मा गांधींनी कधीही गांधी टोपी घातली नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र ही टोपी परिधान करायचे. रत्नाकर यांच्या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. पण गुजरातचे उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांनी रत्नाकर यांची बाजू घेतली आहे. ते सोमवारी म्हटले की संबंधित टोपी 'गांधी टोपी' म्हणून ओळखली जात असली तरी राष्ट्रपितांनी ती टोपी कधीही घातली नाही. ही टोपी घातलेली त्यांना कोणीही पाहिलं नाही.
हेही वाचा-दिलासा! नवा Variant आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी; तज्ज्ञांचं मत
पटेल यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "गांधीजींनी 'गांधी टोपी' घातलेला एकही फोटो पाहिला नाही. किंवा कोणालाही तसा फोटो सापडला नाही. मी सुद्धा अशाप्रकारचा फोटो कधीही पाहिला नाही. त्यामुळे रत्नाकर जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे. रत्नाकर यांनी रविवारी ट्वीट करून म्हटलं होतं की, 'गांधी टोपी पहिल्यांदा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी घातली होती आणि स्वतः महात्मा गांधींनी ही टोपी कधीच परिधान केली नाही. मग या टोपीला 'गांधी टोपी' का म्हणतात?'
हेही वाचा-'Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच... '; पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसच्या गुजरात युनिटनं म्हटले की, ज्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांची बाजू घेतली ते लोकं आता स्वातंत्र्य सैनिक आणि भारताचे पहिले पंतप्रधान यांच्याकडे बोट दाखवत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.