जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच... '; पंतप्रधानांनी अनोख्या पद्धतीनं केलं अभिनंदन

'Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच... '; पंतप्रधानांनी अनोख्या पद्धतीनं केलं अभिनंदन

'Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच... '; पंतप्रधानांनी अनोख्या पद्धतीनं केलं अभिनंदन

टीम इंडियाच्या (Team India) विजयावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं, की ‘लसीकरणाच्या आघाडीवर आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर (पुन्हा) महान दिवस.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 सप्टेंबर : टीम इंडियाने (Team India) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आनंद व्यक्त केला आहे. यासह, पीएम मोदींनी लसीकरणाबाबत (Corona Vaccination in India) बोलतानाही सोमवारच्या आकडेवारीचं वर्णन ‘विलक्षण’ असं केलं आहे. टीम इंडियाच्या (Team India) विजयावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं, की ‘लसीकरणाच्या आघाडीवर आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर (पुन्हा) महान दिवस. नेहमीप्रमाणे, #TeamIndia जिंकली! ’ CoWIN वर उपलब्ध आकडेवारीनुसार, आज देशात 1,08,36,984 कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यामुळे एकूण लसीची व्याप्ती 69,72,90,716 झाली आहे. दिलासा! नवा Variant आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी; तज्ज्ञांचं मत लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारताला आता मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळाली आहे. या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी इंग्लंडवर वर्चस्व गाजवले. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीला इंग्लिश संघाचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पण दुपारच्या जेवणानंतर गोलंदाजांनी सामन्याची दिशा पूर्णपणे बदलली. शार्दुल ठाकूरने इंग्लंडला पहिला धक्का दिला, त्यानंतर खेळाडूंनी सुटकेचा नि: श्वास सोडला. दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लंडने दोन विकेट गमावल्या होत्या आणि सामना कोणाकडेही झुकण्याची शक्यता होती. पण दुपारच्या जेवणानंतर भारतीय गोलंदाजांनी बाजी पलटली. टीम इंडियाने 50 वर्षांनंतर ओव्हलच्या मैदानावर जिंकून इतिहास रचला आहे. मुंगीमुळे महाभारत! बिझनेस क्लासमध्ये होत्या मुंग्याच मुंग्या, विमानात गोंधळ भारताने लसीकरणाच्या बाबतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या 11 दिवसांत तिसऱ्यांदा कोविड -19 लसींचे एक कोटीहून अधिक डोस भारतात देण्यात आले. यासह, देशात आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसची संख्या 69.72 कोटीहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलं, की ‘सप्टेंबरची सुरुवात उच्च स्तरावर झाली आहे आणि भारताने आज एक कोटी कोविड लसींचे डोस दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम नवीन उंची गाठत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात