मराठी बातम्या /बातम्या /देश /कुंभमेळ्यात हजारो खोट्या कोविड टेस्ट; एका घटनेमुळे समोर आली धक्कादायक माहिती, चौकशी सुरू

कुंभमेळ्यात हजारो खोट्या कोविड टेस्ट; एका घटनेमुळे समोर आली धक्कादायक माहिती, चौकशी सुरू

कुंभमेळा प्रशासनाने वेगवेगळ्या प्रयोगशाळांशीही करार केले होते. अँटीजेन टेस्टसाठी 354 रुपये, तर आरटी-पीसीआर टेस्टसाठी 500 रुपये असा दर ठरला होता. दरम्यान, उत्तराखंडचे आरोग्य सचिव अमित नेगी यांनी संबंधित फर्मचं तीन कोटी रुपयांचं पेमेंट थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 17 जून : हरिद्वारमध्ये (Haridwar) झालेल्या कुंभमेळ्यावेळी (Kumbh) कोविड टेस्ट (Covid Test) करण्यासाठी नेमलेली फर्म केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचं न्यूज 18 च्या शोधपत्रकारितेतून लक्षात आलं आहे. संबंधित फर्मने नेमलेल्या प्रयोगशाळांनी कोविडच्या हजारो खोट्या टेस्ट्स (Fake Covid Test) केल्याचं वृत्त आहे.

न्यूज 18 च्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, हरिद्वार कुंभमेळा प्रशासनाने (Kumbh Administration) कोविडच्या चाचण्या घेण्यासाठी एप्रिल महिन्यात मॅक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेशी सामंजस्य करार केला होता. त्या संस्थेने रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्यांकरता नमुने घेण्यासाठी दोन प्रयोगशाळा ठरवून घेतल्या होत्या.

विपन मित्तल (Vipan Mittal) या पंजाबी नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर असं आढळून आलं, की या ठिकाणी घेण्यात आलेल्या हजारो चाचण्या खोट्या आहेत. त्यानंतर न्यूज 18 च्या प्रतिनिधीने रेकॉर्डमध्ये दिलेल्या पत्त्यावर मॅक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कार्यालयाला भेट दिली, मात्र तिथे कार्यालय अस्तित्वातच नसल्याचं आढळलं. (नवी दिल्लीच्या भिकाजी कामा प्लेस एरियातला पत्ता देण्यात आला होता.)

वेबसाईटवर दिलेल्या माहितीच्या आधारे न्यूज 18 ची टीम त्या संस्थेच्या नोएडाच्या सेक्टर 63 मधल्या ऑफिसमध्ये पोहोचली. मात्र ऑफिस रिकामं होतं आणि त्या ऑफिसच्या गेटला बाहेरून साखळी लावण्यात आलेली होती. तसंच प्रॉपर्टी डीलरचे नंबर्स तिथे बाहेर लटकवण्यात आलेले होते.

या प्रकरणात आवाज उठवलेली विपन मित्तल ही व्यक्ती फरीदकोटमध्ये एलआयसी एजंट म्हणून काम करते. त्या व्यक्तीला तिचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं एसएमएसद्वारे कळवण्यात आलं होतं, मात्र विपन यांना धक्का बसला, कारण त्यांनी टेस्ट केलीच नसतानाही त्यांना रिपोर्ट पाठवण्यात आला होता.

(वाचा - धोकादायक! राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे थैमान, 'या' जिल्ह्यात अधिक रुग्ण)

सुरुवातीला त्यांना वाटलं, की आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात पडली आहे आणि त्या माहितीचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र तिथे त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात फारसा रस न दाखवल्यामुळे विपनने थेट ICMR कडे तक्रार दाखल केली. ICMR ने त्याची दखल घेतली, मात्र बरेच दिवस त्यावर पुढे काहीच झालं नाही. शेवटी विपन यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्रश्न विचारला. त्यानंतर प्रकरणाची दखल घेतली गेली आणि मग केलेल्या चौकशीत असं लक्षात आलं, की विपन यांची कथित टेस्ट हरिद्वारमधल्या लॅबने केली आहे.

पुढे झालेल्या तपासात असं निष्पन्न झालं, की केवळ विपन मित्तलच नव्हे, तर लाखो जणांना अशा प्रकारे टेस्टचे बोगस रिपोर्ट्स (Bogus Reports) देण्यात आले होते.

(वाचा - ...तर कोरोना लशीचाही काही फायदा होणार नाही, तज्ज्ञांनी सांगितलं काळजी कशी घ्याल?)

कुंभमेळ्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन सेंगर यांनी सांगितलं, की त्या फर्मने सगळी कागदपत्रं सादर केली असल्यामुळे त्याबद्दल शंका येण्यासारखं काही नव्हतं. त्या कन्सल्टन्सी फर्मचा कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून अर्जुन नेगी नावाच्या व्यक्तीचा संपर्क देण्यात आला होता. त्याच्याशी संपर्क साधल्यावर कळलं, की तो आता त्या संस्थेसोबत काम करत नाही. 'मी कोणत्याही गैरकृत्याला जबाबदार नाही. मी फारच थोडा काळ संस्थेला मदत केली,' असं त्याने सांगितलं.

कुंभमेळा प्रशासनाने वेगवेगळ्या प्रयोगशाळांशीही करार केले होते. अँटीजेन टेस्टसाठी 354 रुपये, तर आरटी-पीसीआर टेस्टसाठी 500 रुपये असा दर ठरला होता. दरम्यान, उत्तराखंडचे आरोग्य सचिव अमित नेगी यांनी संबंधित फर्मचं तीन कोटी रुपयांचं पेमेंट थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

'हरिद्वार प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे आणि योग्य बाजू पुढे येईल, असा विश्वास आहे,' असं उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी सांगितलं.

(वाचा - ब्लॅक, व्हाइट, येलोनंतर Green fungus; किती धोकादायक आहे फंगस, काय आहेत लक्षणं)

अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार, हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी प्रशासनाने नेमलेल्या 22 प्रयोगशाळांकडून सुमारे चार लाख कोविड टेस्ट्स केल्या गेल्या. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, आखाडा परिषदेचे प्रमुख नरेंद्र गिरी आदी मान्यवरांसह अनेक जण कुंभमेळ्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.

First published:

Tags: Coronavirus, Kumbh mela