Home /News /coronavirus-latest-news /

काळजी घ्या! महाराष्ट्रात वाढतायेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे कोरोना रुग्ण

काळजी घ्या! महाराष्ट्रात वाढतायेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे कोरोना रुग्ण

Corona Virus: भारतात आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या डेल्टा व्हेरिएंटचा शोध पहिल्यांदा भारतातच लागला.

मुंबई, 17 जून: कोरोना विषाणू (SARS-CoV-2) सतत म्युटेट होत असून डेल्टा म्हणजेच (B.1.617.2) या व्हेरिएंटममध्ये म्युटेशन (Latest Covid Variant) होऊन नवा डेल्टा प्लस किंवा ‘AY.1’ हा प्रचंड संसर्गजन्य व्हेरिएंट तयार झाला आहे. भारतात आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या डेल्टा व्हेरिएंटचा शोध पहिल्यांदा भारतातच लागला. ग्लोबल सायन्स इन्हिशिएटिव्ह GISAID या सायन्स एजन्सीने K417N म्युटेशनसह डेल्टा व्हेरिएंटचे 63 जीनोम्स सापडल्याचं जाहीर केलंय अशी माहिती इंग्लंडमधील पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने दिली आहे. शुक्रवारी या एजन्सीने ताजा रिपोर्ट जाहीर केला आहे त्यानुसार 7 जूनपर्यंत भारतातील सहा जीनोममध्ये नवा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे. सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. पण शास्रज्ञांच्या मते या व्हेरिएंटमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचं कारण नाही. या नव्या व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती तुमच्यासाठी आपल्याला काय माहिती आहे (B.1.617.2.1) या नव्या व्हेरिएंटला AY.1 असंही म्हटलं जातं. दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता. औषधांना हा व्हेरिएंट कसा प्रतिसाद देत आहे? सध्याच्या घडीला डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे कोविडची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आजार खूप गंभीर झाल्याचं उदाहरण भारतात सापडलेलं नाही. कोविड-19 च्या मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल ट्रिटमेंटद्वारे भारतात त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते यशस्वी होत आहेत. Casirivimab आणि Imdevimab या मोनोक्लोनल अँटिबॉडी स्पाइक प्रोटीन SARS-CoV-2 विरुद्ध काम करतात त्यांचं कॉकटेल असलेलं औषध आपत्कालीन परिस्थितीत वापरायला नुकतीच सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) परवानगी दिली आहे. रोचे इंडिया आणि सिप्ला या मोठ्या औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या अँटिबॉडी कॉकटेलची प्रत्येक डोसची किंमत 59 हजार 750 रुपये आहे. कोविडशी लढणाऱ्या ज्या अँटिबॉडी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतात तशाच कृत्रिम मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रयोगशाळेत तयार करून त्या औषध म्हणून वापरतात. विषाणूला विरोध करणाऱ्या शरीरातील प्रतिकारशक्तीला चकवा देण्याच्या क्षमतेशी या म्युटेशनचा संबंध असू शकतो असंही स्कारिया यांनी म्हटलं आहे. इम्युनॉलॉजिस्ट आणि पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (IISER) गेस्ट फॅकल्टी असलेल्या विनीता बाळ यांच्या मते नव्या व्हेरिएंटमुळे कदाचित कमर्शियल अँटिबॉडी कॉकटेलच्या वापराला अडथळा निर्माण होऊ शकतो पण जरी या थेरेपीला नव्या व्हेरिएंटने विरोध केला तरीही त्याचा अर्थ असा नाही की त्यामुळे कोविडचा गंभीर आजार होणार आहे. हेही वाचा- असा असेल CBSE 12 वीचा निकाल, जाणून घ्या फॉर्म्यूला नवा व्हेरिएंट कितपत संसर्गजन्य आहे? बाळ पुढे म्हणाल्या, ‘हा नवा डेल्टा प्लस विषाणू कितपत वेगाने पसरतो हे आताच ठरवणं अवघड आहे. या म्युटेशनमुळे नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पॅथोजेन्स आणि अँटिबॉडीजमधील किती अँटिबॉडींना हा व्हेरिएंट निकामी करतो त्यावर तो किती संसर्गजन्य ठरेल याचा एक अंदाज बांधता येईल. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णाला फारशी चिंता करण्याची गरज नाही.’ पल्मोनॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय संशोधक आणि CSIR-IGIBचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी पीटीआयला सांगितलं की या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या तरी भारतात कुणाला चिंता करायची गरज नाही. हेही वाचा- वन-डे क्रिकेटमधील सर्वात थरारक मॅचची तुमची आठवण काय? पाहा कधीही न विसरणारा VIDEO The Council of Scientific and Industrial Research – National Chemical Laboratory (CSIR-NCL) या संस्था रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाताली कोविड नमुन्यात डेल्टा-प्लस व्हेरिएंट सापडतो का हे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास करत आहेत. सुरुवातीला सहा जणांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याची बातमी होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 13 जून या काळात 13.9 टक्के डेल्टाप्लस व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण सापडले असून याच काळात रत्नागिरी जिल्ह्यात 9.03 टक्के रुग्ण सापडले आहेत. कोविड-19 अॅक्टिव्ह केसेसचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पहिली दोन नावं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या