Home /News /coronavirus-latest-news /

...तर कोरोना लशीचाही काही फायदा होणार नाही, तज्ज्ञांनी सांगितलं काळजी कशी घ्यायची?

...तर कोरोना लशीचाही काही फायदा होणार नाही, तज्ज्ञांनी सांगितलं काळजी कशी घ्यायची?

गेल्या दीड वर्षापासून देश कोरोनाविरोधातली (Corona Virus) लढाई लढतो आहे. पहिल्या लाटेतून बाहेर आलो म्हणेपर्यंत दुसऱ्या लाटेने कंबरडं मोडलं. आता आपल्या हाती लशीचं शस्त्र आहे. तसंच आयुष विभागाच्या दोन औषधांद्वारेही कोरोनावर मात करणं शक्य झालं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जून : गेल्या दीड वर्षापासून देश कोरोनाविरोधातली (Corona Virus) लढाई लढतो आहे. पहिल्या लाटेतून बाहेर आलो म्हणेपर्यंत दुसऱ्या लाटेने कंबरडं मोडलं. आता आपल्या हाती लशीचं शस्त्र आहे. तसंच आयुष विभागाच्या दोन औषधांद्वारेही कोरोनावर मात करणं शक्य झालं आहे. तरीही अद्याप कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात ठोस यश मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण अधिक चांगल्या तऱ्हेने सज्ज होऊन उभे आहोत. तरीही माणसाच्या थोड्याशा बेफिकिरीचाही कोरोनाकडून फायदा घेतला जातो आणि संसर्गात वाढ होते, असं आढळलं आहे. त्यामुळे सामूहिक पातळीवर कोरोना संसर्गाची साखळी (Corona Chain) तोडता आलेली नाही. त्यामुळे कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियरवर (CAB) विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या सेंटर ऑफ सोशल मेडिसीन अँड कम्युनिटी हेल्थ विभागाचे अध्यक्ष डॉ. राजीवदास गुप्त यांनी ही माहिती दिली. केवळ कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियरच (Covid Appropriate Behaviour) लोकांना कोविडपासून वाचवू शकेल. कारण आपल्या एका बेसावध क्षणाची कोरोना वाट पाहत असतो. म्हणूनच योग्य वर्तनातून लोक स्वतःचा तर बचाव करू शकतीलच, पण त्याचा प्रसार होण्यालाही प्रतिबंध करू शकतील. समस्येचं मूळ आपल्याला समजलेलं असतानाही आपण त्या पद्धतीने वागलो नाही, तर ते खूपच बेजबाबदार वर्तन ठरेल, असं डॉ. गुप्त म्हणतात. मोठ्या समुदायाने योग्य वर्तन केलं नाही, तर विषाणूचा फैलाव (Transmission) होण्यासाठी संधीच मिळते. हा विषाणू रूप बदलत राहतो आणि अत्यंत चलाखही आहे. या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग महाराष्ट्रात काही जणांना झाल्याचं आढळलं आणि एक-दोन महिन्यांत संपूर्ण देशातच तो पसरला. कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियर यामध्ये मास्क (Mask) परिधान करणं, सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) पाळणं, हात आणि शरीराची स्वच्छता, लक्षणं दिसू लागताच स्वतःला आयसोलेट करणं (Isolation) या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. डॉ. गुप्त म्हणतात, की कोरोनाचा म्युटंट व्हेरिएंट इतका चलाख आहे, की आरटीपीसीआरऐवजी सीटीची गरज पडू लागली. दीड वर्षाच्या काळात आपण विषाणूला ओळखू लागलो आहोत. लस (Vaccine) आणि कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियर यापेक्षा अन्य कोणत्याही उपायाने कोरोनावर मात करता येणार नाही. मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण झालं आणि त्या लोकसंख्येने कोरोनायोग्य वर्तन केलं, तर कोरोनाला संसर्ग होण्यासाठी शरीरच मिळणार नाही. त्यामुळे विषाणूचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी अधिक नेमकेपणाने आपण युद्ध करू शकू; मात्र तसं झालं नाही तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही. आपण ज्याप्रमाणे कोरोनाला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, त्याप्रमाणे कोरोनाही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतो आहे. त्यामुळे तो नवनवे व्हॅरिएंट्स घेऊन येतो. त्यांचा संसर्ग पसरण्यासाठी मानवी शरीरं मिळाली, तर आणखीही नवे व्हॅरिएंट्स समोर येऊ शकतात. मानवी शरीरात विषाणूची संख्या वाढण्यासाठी, तसंच स्वतःत बदल करण्यासाठी कोरोनाला अनुकूल वातावरण मिळतं. मग आपण कोरोनाच्या ताब्यात शरीर द्यायचं की नाही, हे आपलं आपणच ठरवायचं आहे. आरोग्यविषयक सुविधा चौपट वाढवल्या, तरी कोविड अनुरूप वर्तन ठेवलं तरच संसर्गापासून बचाव होऊ शकतो. काही लोकांमध्ये जागरूकता झाली आहे; मात्र कोरोना रुग्णसंख्या घटताच लगेच बेपर्वाई वाढलेली दिसते. मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं वगैरे गोष्टी न विसरता अंगवळणी पाडून घेतल्या पाहिजेत, असं आवाहन डॉक्टर करतात.
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या