मराठी बातम्या /बातम्या /explainer /

ब्लॅक, व्हाइट, येलोनंतर आता Green fungus; किती धोकादायक आहे फंगस आणि काय आहेत लक्षणं

ब्लॅक, व्हाइट, येलोनंतर आता Green fungus; किती धोकादायक आहे फंगस आणि काय आहेत लक्षणं

ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद देशात झाली आहे.

ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद देशात झाली आहे.

ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद देशात झाली आहे.

नवी दिल्ली, 16 जून : कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आलेली असताना देशात फंगसनंही (Fungus) थैमान घातलं आहे. ब्लॅक फंगस (Black Fungus),  व्हाईट फंगस (White fungus), येलो फंगसनंतर (Yellow fungus) आता ग्रीन फंगसही (Green fungus) सापडला आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता हा ग्रीन फंगस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि तो किती धोकादायक आहे, याची माहिती तुम्हाला असायलाच हवी.

ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद देशात झाली आहे. इंदूरवरून विमानाने मुंबईला आणण्यात आलेल्या एका पेशंटला हा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. त्या रुग्णाला काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने त्याचं नेमकं निदान करण्यासाठी त्याची चाचणी करण्यात आली. त्यात असं आढळून आलं, की त्या व्यक्तीला ग्रीन फंगसचा संसर्ग झाला आहे.

हे वाचा - खरं की खोटं? Covaxin साठी गाईच्या सीरमचा वापर?

ग्रीन फंगसचा संसर्ग होण्यालाच अॅस्परजिलॉसिस असंही म्हणतात. हा संसर्ग झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांमध्ये नाकातून होणारा रक्तस्राव आणि ताप ही दोन प्रमुख लक्षणं आहेत. ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्यास वजन मोठ्या प्रमाणात घटतं आणि अशक्तपणाही येतो. वर उल्लेख केलेल्या ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णात ही सर्व लक्षणं आढळून आल्याची माहिती डॉ. रवी दोसी यांनी दिल्याचं वृत्त रिपब्लिकन वर्ल्डने दिलं आहे. कोविड-19 मधून बरे झालेल्यांना ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्यावर दिसणारी लक्षणं आणि अन्य कोणत्या रुग्णाला ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्यास दिसणारी लक्षणं यात काही फरक आहे का, हे तपासण्यासाठी संशोधनाची गरज आहे, असं डॉ. रवी दोसी म्हणाले.

हे वाचा - आनंदाची बातमी! लवकरच भारतात लाँच होणार Covovax लस, प्रभावाबाबत कंपनीचा मोठा दावा

ज्या रुग्णात पहिल्यांदा या ग्रीन फंगसच्या संसर्गाची नोंद झाली आहे, त्या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी इंदूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 34 वर्षांच्या या रुग्णाच्या फुप्फुसांत कोरोनाचा 100 टक्के संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात जवळपास महिनाभर उपचार सुरू होते. मंगळवारी (15 जून) या रुग्णाला उपचारांसाठी इंदूरवरून मुंबईला आणण्यात आलं. तिथे तपासणी केल्यावर त्याचे सायनसेस, फुप्फुसं आणि रक्तात ग्रीन फंगसचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. ग्रीन फंगसचा हा देशातला पहिलाच रुग्ण असल्याची शक्यता इंदूरच्या आरोग्य विभागाच्या डिस्ट्रिक्ट डेटा मॅनेजर अपूर्वा तिवारी यांनी वर्तवली.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Health