गांधीनगर, 28 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून नुकताच राजीनामा दिलेल्या नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी देखील केली. आमदार, खासदार यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला आहे. राकंपाचे पूर्व महासचिव आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांना कोरोनाची लागण झाली आहे. शंकर सिंह वाघेला यांना मागच्या तीन ते चार दिवसांपासून ताप येत होता. ताप कमी होत नसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सध्या वाघेला यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तब्येत आणखीन बिघडल्यास तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या वाघेलांची मातब्बर नेते अशी ओळख आहे. पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून त्यांनी 21 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजीनामा दिला. हे वाचा- COVID-19चा विस्फोट, जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण भाजपमध्ये राजीनामा देऊन शंकर सिंह वाघेला यांनी स्वत:चा पक्ष काढला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र कुठल्याच पक्षात ते फार काळ रमले नाहीत. 1996-97 या काळात ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांना तीन ते चार दिवसांपासून सतत ताप येत असल्यानं कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर वाघेला यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली. सध्या त्यांच्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनाच होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे वाचा- लहान मुलांना जपा, मुंबईत आढळली कोरोनासह नव्या आजाराची लक्षण आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत कोरोना रुग्णाचा एकूण आकडा 5,28,859 वर पोहोचला आहे. मागच्या 24 तासांमध्ये 19,906 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. आतापर्यंत देशा 203051 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर 309713 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे आतापर्यंत देशात 16095 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.