लहान मुलांना जपा, मुंबईत आढळली कोरोनासह नव्या आजाराची लक्षण

लहान मुलांना जपा, मुंबईत आढळली कोरोनासह नव्या आजाराची लक्षण

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 11 से 20 वयाची 9371 रुग्ण आढळून आली. तर 10 वर्षांपेक्षा कमी वयाची 5103 प्रकरणे समोर आली

  • Share this:

मुंबई, 28 जून : मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे मुंबईतील  मुलांमध्ये  कावासाकी (Kawasaki) आजारीची लक्षण आढळून आली आहे. पश्चिम मुंबईतील एका रुग्णात या आजारीची लक्षण आढळून आली आहे. भारतात कावासाकी आजारी लक्षण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.

मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला दाखल करण्यात आले आहे. या मुलाल तीव्र ताप होता आणि शरिरावर डाग असल्याचे आढळून आले आहे. शरिरावर आलेले हे डाग कावासाकी आजाराची लक्षण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही दिवसांनी या मुलाची प्रकृती अचानक खालावली, त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या मुलावर वेगवेगळी औषधांसह टोसिलजेमेब दिले जात आहे. या मुलाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यालाही कोरोनाची लागण झाली.

धक्कादायक म्हणजे, भारतातच नाहीतर इतर देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजारीची लक्षणे आढळून आली. एप्रिल महिन्यात अमेरिका, स्पेन, इटली आणि चीनमध्ये कोरोनाबाधित रुग्णामध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. अमेरिकेत आतापर्यंत

58 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये  कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. कावासाकी आजाराची लक्षण ही शक्य तो 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळून येतात.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 11 से 20 वयाची 9371 रुग्ण आढळून आली. तर 10 वर्षांपेक्षा कमी वयाची  5103 प्रकरणे समोर आली. बालरोग तज्ञ  तनु सिंघल यांनी सांगितले की, कावासाकी आजारीची लक्षण आढळून आलेल्या युवकांची प्रकृती लवकर खालावत जाते. अशावेळी त्या मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे.

कावासाकी आजाराची लक्षण

तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे,  त्वचेवर पुरळ उठणं,  डोळे लाल होणे, हात पाय सुजणे आणि ओठांना भेगा  अशी लक्षण कावासाकी आजारीची आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने मुलांना रुग्णालयात दाखल करा, असं आवाहन केले आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 28, 2020, 9:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading