जाहिरात
मराठी बातम्या / देश / COVID-19चा विस्फोट, जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण

COVID-19चा विस्फोट, जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण

कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं.

कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं.

उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण कमी होईल असा अनुमान लावण्यात आला होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जून : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट जगभरात आहे.एका दिवसात महाराष्ट्रात 5 हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात मागच्या 24 तासांमध्ये 15 हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. वर्ल्डडोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 कोटीहून अधिक झाल्याची नोंद करण्यात आली. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण कमी होईल असा अनुमान लावण्यात आला होतं. मात्र हे अनुमान चुकीचं निघाल्याचं सांगितलं जात आहे. मे आणि जून महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त 67 टक्के रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी 1 लाख 35 हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत. कोरोना विषाणूची दुसरी लहर आली किंवा कोरोनाचा कहर असाच वाढला तर यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. स्पॅनिश फ्लूचा संदर्भ देताना WHO चे सहायक महासंचालक रानेरी गुएरा म्हणाले की, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या थंड वातावरणात साथीच्या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा हाहाकार वाढले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे वाचा- ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, केंद्रीय पथकाने महापालिकांना दिल्या ‘या’ सूचना अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत होत असलेली वाढ अजुनही सुरूच आहे. शनिवारी तर आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5318 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 59 हजार 133वर गेला आहे. सगल दुसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 167 जणांचा मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7273 वर गेला आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात