मराठी बातम्या /बातम्या /देश /खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना स्वतः उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत; रियाझ आणि रितेशवर होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO

खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना स्वतः उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत; रियाझ आणि रितेशवर होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO

आजींना काहीही करून देवीचं दर्शन घ्यायचंच होतं. दिवसभर त्या घुटमळत होत्या, पण मंदिरापर्यंतच्या पायाऱ्या चढणं शक्य नव्हतं. शेवटी पोलीस कॉन्टेबल रियाझ भारखानी (Riyaz Bharkhani) आणि रितेश पटेल (Ritesh Patel) यांनी अक्षरशः उचलून त्यांना मंदिरापर्यंत पोहोचवलं. पाहा VIDEO

आजींना काहीही करून देवीचं दर्शन घ्यायचंच होतं. दिवसभर त्या घुटमळत होत्या, पण मंदिरापर्यंतच्या पायाऱ्या चढणं शक्य नव्हतं. शेवटी पोलीस कॉन्टेबल रियाझ भारखानी (Riyaz Bharkhani) आणि रितेश पटेल (Ritesh Patel) यांनी अक्षरशः उचलून त्यांना मंदिरापर्यंत पोहोचवलं. पाहा VIDEO

आजींना काहीही करून देवीचं दर्शन घ्यायचंच होतं. दिवसभर त्या घुटमळत होत्या, पण मंदिरापर्यंतच्या पायाऱ्या चढणं शक्य नव्हतं. शेवटी पोलीस कॉन्टेबल रियाझ भारखानी (Riyaz Bharkhani) आणि रितेश पटेल (Ritesh Patel) यांनी अक्षरशः उचलून त्यांना मंदिरापर्यंत पोहोचवलं. पाहा VIDEO

पुढे वाचा ...

  अहमदाबाद, 9 ऑक्टोबर: इच्छा तिथे मार्ग असं कित्येक वेळा म्हटलं जातं. गुजरातमध्ये एका वृद्ध महिलेला याच गोष्टीची प्रचिती आली. ऐंशी वर्षांच्या या महिलेला मंदिरात (Gujrat Cops help elderly woman) जाण्यासाठी अडचण येत होती. या वेळी खाकी वर्दीतल्या दोन (Gujrat Police help octogenarian woman) देवदूतांनी तिला मदत केली. या घटनेबाबतची माहिती उघड झाल्यानंतर आता या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातल्या रहिवासी असणाऱ्या पवित्रा हरीराव जाधव या नवरात्रीच्या निमित्ताने गुजरातमधल्या पावागढ (Elderly woman Pavagadh temple) येथे आल्या होत्या. या ठिकाणी असलेल्या मंदिरात त्यांना दर्शन घेण्यासाठी जायचं होतं; मात्र मंदिर खूप उंचावर असल्यामुळे त्यांना तिथे जाण्यास अडचण येत होती. विशेष म्हणजे आजीबाई एकट्याच एवढ्या दूर आल्या होत्या.

  नवरात्रीनिमित्त पावागढ येथे तैनात असलेल्या पोलिसांनी (Pavagadh Police) या आजींना पाहिलं. त्यांनी या आजींची विचारपूस केली असता, त्या दर्शनासाठी आतुर असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर मग ग्रामरक्षक दलातल्या दोघांनी या आजींना मदत करण्याचा प्रयत्न केला; पण ते आजींना मंदिरापर्यंत नेऊ शकले नाहीत. पोलिसांनी मग दर्शनाचा विचार सोडण्याच्या दृष्टीने आजींचं मन वळवण्याचाही प्रयत्न केला; पण पवित्राबाई आपल्या निश्चयावर ठाम होत्या.

  पावागढच्या डोंगरावर जाण्यासाठी रोपवेची (Pavagadh temple) सुविधा उपलब्ध आहे. परंतु रोपवेच्या स्थानकापर्यंत जाण्यासाठी भरपूर पायऱ्या चढाव्या लागतात. आजींना काहीही करून दर्शन घ्यायचंच आहे म्हटल्यावर तिथे तैनात असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रियाझ भारखानी (Riyaz Bharkhani) आणि रितेश पटेल (Ritesh Patel) या दोन कॉन्स्टेबल्सना बोलावलं. त्या दोघांना परिस्थितीची कल्पना देताच, दोघेही या आजींना मंदिरापर्यंत घेऊन जाण्यास तयार झाले.

  त्यानंतर मग या दोघांनी आळीपाळीने आजींना उचलून घेऊन, मंदिराचे दर्शन घडवले. विशेष म्हणजे, हे दोघेही नवरात्रीनिमित्त (Navratri Pavagadh) दिवसभर मंदिर परिसरात तैनात होते. तरीही सायंकाळी या आजींच्या मदतीसाठी ते तातडीने तयार झाले. “या आजीही सकाळपासून मंदिर परिसरातच होत्या. दर्शन घेतल्याशिवाय परत जाणार नाही असा त्यांचा निर्धार होता. त्यामुळे आम्ही त्यांना लगेच मदत करायचं (Police carried elderly woman till temple) ठरवलं,” असं रियाझ म्हणाले.

  पवित्राबाईंकडे घरच्यांचं नाव आणि नंबर असलेली एक डायरी होती. त्याच्या साह्याने पोलिसांनी त्यांच्या घरी संपर्क साधला. तेव्हा समजलं, की या आजी घरी कोणालाही न सांगता निघून आल्या आहेत. त्यांचा मुलगा किशोर जाधव यांनी सांगितलं, की नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच त्यांना पावागढचं दर्शन घ्यायचं होतं; मात्र त्यांच्या घरीही देवी बसणार असल्यामुळे कोणालाही पावागढला जाण्यासाठी वेळ नव्हता. यानंतर मग पवित्राबाई कोणालाही न सांगता मंगळवारी स्वतःच गुजरातला निघून गेल्या.

  किशोर यांनी पोलिसांना पुढच्या बसबाबत माहिती दिली. तसेच बस चालकाशीही फोनवर चर्चा केली. बसच्या चालकानेही पवित्राबाईंना त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या गावात नीट सोडणार असल्याचं, तसंच पुढच्या बसमध्येही बसवून देणार असल्याचं सांगितलं. “या पोलिसांनी माझ्या आईला देवदर्शन (Police carried woman till temple) तर घडवून आणलंच, पण तिची भरपूर काळजीही घेतली. मी त्यांचा कायमच ऋणी राहणार आहे. लवकरच मी स्वतः त्यांची भेट घेऊन आभार मानणार आहे,” असं किशोर यांनी सांगितलं.

  First published:

  Tags: Gujrat, Navratri, Police