• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • गूढ कायम! झाडावर लटकत होता बेपत्ता तरुणाचा मृतदेह, किरकोळ भांडणानंतर होता तणावात

गूढ कायम! झाडावर लटकत होता बेपत्ता तरुणाचा मृतदेह, किरकोळ भांडणानंतर होता तणावात

दोन दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा (Dead body of a youth found hanging on tree) मृतदेह एका झाडावर लटकलेला सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  जयपूर, 8 ऑगस्ट : दोन दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा (Dead body of a youth found hanging on tree) मृतदेह एका झाडावर लटकलेला सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मोबाईलच्या दुकानात झालेल्या किरकोळ (Youth was under mental pressure) वादानंतर हा तरुण प्रचंड तणावाखाली असल्याचं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्या तणावातून तरुणाने आत्महत्या केली (Murder or suicide) आणि कुणी त्याच हत्या केली, याचा तपास पोलीस करत आहेत. दुकानाची फुटली होती काच राजस्थानच्या अजमेरमधील कोटडा भागात दोन दिवसांतोपासून सुरेंद्र कोटडा नावाचा तरुण गायब होता. हा तरुण एका मोबाईलच्या दुकानात गेला होता. तिथून बाहेर पडताना पाय घसरल्यामुळे दुकानाची काच फुटली होती. यावरून दुकानाच्या मालकाशी वाद होऊन सुरेंद्रला मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर तो प्रचंड तणावाखाली होता. घरातून गायब झालेला सुरेंद्र दोन दिवसांपासून घरीच आला नव्हता. घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं, मात्र तो कुठेच आढळला नाही. झाडावर आढळला मृतदेह गावातील एका बाभळीच्या झाडावर अचानक एक मृतदेह नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो सुरेंद्रचाच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. हे वाचा - नागपूर हादरलं, मित्रांना मारहाण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार हत्या की आत्महत्या? सुरेंद्र गेल्या दोन दिवसांपासून तणावाखाली असल्याचं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. मोबाईल गॅलरीत काच फुटल्यानंतर झालेली मारहाण आणि सुरेंद्रचा मृत्यू यांचा एकमेकांशी काही संबध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. सुरेंद्रनं तणावातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय आहे. मात्र त्याच्या हत्येची शक्यताही पोलिसांनी फेटाळून लावलेली नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याच्या रिपोर्टवरून अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
  Published by:desk news
  First published: