मराठी बातम्या /बातम्या /देश /

आजीबाई जोमात... केला तरुणांनाही लाजवणारा विक्रम, 18000 फूट उंचीवर 420 KM सायकलची दौड

आजीबाई जोमात... केला तरुणांनाही लाजवणारा विक्रम, 18000 फूट उंचीवर 420 KM सायकलची दौड

रेणू सिंघी, फोटो सौजन्य- DB

रेणू सिंघी, फोटो सौजन्य- DB

रेणू सिंघी यांनी 18 हजार फूट उंचीवर श्रीनगर ते लेह (Srinagar to Leh Cycling) हे सुमारे 420 किलोमीटर्सचं अंतर सायकलवरून पार केलं आहे आणि तेही वयाच्या 55 व्या वर्षी.

जयपूर, 09 ऑक्टोबर: सध्या नवरात्रीचा (Navratri 2021) उत्सव सुरू आहे. पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान केला जात आहे. सहनशील, दुबळी समजली जाणारी स्त्री वेळ पडल्यास दुर्गेचं रूपही धारण करू शकते याची जाणीव करून देणाऱ्या या पर्वात स्त्री शक्तीची अनेक प्रेरणादायी उदाहरणं जगासमोर येत आहेत. स्त्रीने एखादी गोष्ट करायची ठरवली, तर त्यात कितीही अडथळे आले तरी ती त्यावर मात करून आपलं ध्येय साध्य करते. याचंच एक उदाहरण म्हणजे राजस्थानच्या (Rajasthan) रेणू सिंघी (Renu Singhi Latest Record News).

रेणू सिंघी यांनी 18 हजार फूट उंचीवर श्रीनगर ते लेह (Srinagar to Leh Cycling) हे सुमारे 420 किलोमीटर्सचं अंतर सायकलवरून पार केलं आहे आणि तेही वयाच्या 55 व्या वर्षी. हा विक्रम करणाऱ्या त्या राजस्थानमधल्या एकमेव महिला सायकलपटू (Woman Cyclist Renu Singhi) आहेत. जयपूर सायकलिंग क्लब (JCC) आणि जोधपूर बायसिकलिंग ग्रुप (JBG) यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या फेरीत राजस्थानमधल्या 7 सायकलस्वारांनी भाग घेतला होता. त्यात रेणू सिंघी या एकमेव महिला सायकलपटू होत्या. दैनिक भास्करने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

VIDEO: तासाभराच्या पावसाने पाणीच पाणी! दोघजणं वाहून गेल्याने रेस्क्यू ऑपरेशन

अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि ऑक्सिजनची कमतरता भासणाऱ्या या भागात सायकल चालवणं अतिशय आव्हानात्मक आहे; मात्र रेणू यांनी आपल्या इच्छाशक्ती आणि मनोबलाच्या ताकदीवर अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे.

जयपूरच्या सायकलपटू रेणू सिंघी या आयर्न लेडी (Iron Lady Renu Singhi ) म्हणून ओळखल्या जातात. अनेक कठीण स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. दोन नातवंडं असणाऱ्या रेणू सिंघी यांनी वयाच्या 50व्या वर्षी सायकलिंगला सुरुवात केली ती फिट राहण्यासाठी काही तरी व्यायाम केला पाहिजे या उद्देशाने. दररोज जिममध्ये जाण्यासाठी त्यांना वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी सायकल घेतली. यानंतर त्या जयपूर सायकलिंग क्लबमध्ये (JCC) सहभागी झाल्या. या क्लबचे अध्यक्ष सुनील शर्मा यांनी त्यांना सायकलिंगसाठी खूप प्रेरित केलं. क्लबच्या सदस्यांसह सकाळी नाहरगढला जाणं, शहरात फिरणं यामुळे रेणू यांचा आत्मविश्वास वाढला आणि सायकलिंग ही त्यांची आवड बनली.

भारताच्या Coaching city मध्ये तयार होतंय भन्नाट सॅटेलाईट Railway Station

यातूनच त्यांनी ही अफाट कामगिरी केली. जयपूर सायकलिंग क्लबच्या श्रीनगर ते लेह या सायकल फेरीला 26 सप्टेंबर रोजी श्रीनगरमधून सुरुवात झाली. सोनमर्ग, कारगिल, बुध खरबु, सासपोलमार्गे लेहमध्ये ही फेरी समाप्त झाली. दररोज 80 ते 120 किलोमीटर सायकलिंग केलं जात होतं. लेहनंतर 2 ऑक्टोबर रोजी समुद्रसपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला इथंही ते गेले. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी परतपूर आणि तुर्तुक इथं आल्यानंतर त्यांचा हा प्रवास पूर्ण झाला.

फोटो सौजन्य- DB

'हा प्रवास अतिशय रोमांचक होता. खारदुंगला हा जगातील सर्वोच्च मोटरेबल (वाहन जाणारा) रस्ता असून, तिथे ऑक्सिजनची पातळी खूप कमी असल्याने जास्त काळ थांबता आलं नाही; पण ते अतिशय रमणीय असं दृश्य होतं,' अशी प्रतिक्रिया रेणू यांनी व्यक्त केली.

सुमारे पाच वर्षांपूर्वी सायकलिंग सुरू करणाऱ्या रेणू सिंघी यांनी आतापर्यंत 60 हजार किलोमीटर्स सायकलिंग केलं आहे. या प्रवासात 2019 साली पॅरिसमध्ये 92 तासांत 1220 किलोमीटर्स, टूर डी राजस्थानमध्ये 1200 किलोमीटर्स आणि जी टू जीमध्ये (G2G) केलेल्या 1460 किलोमीटर्स सायकलिंगचा समावेश आहे. कोटा सायकलिंग समुदायाद्वारे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत 1785 किलोमीटर्स सायकल चालवून आणि 426 किलोमीटर्स धावून त्यांनी महिलांच्या गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. पाच दिवसांत 1500 किलोमीटर्स सायकलिंग करण्याची सुपर रेनडोन्युअर स्पर्धाही त्यांनी चार वेळा पूर्ण केली आहे.

Corona Updates : एकही डोस न घेतलेले कर्मचारी ठरणार ‘गैरहजर’, 'या' सरकारचा निर्णय

स्त्रीसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तिने एकदा ठरवलं तर वय, शक्ती असे कोणतेही अडथळे तिला थांबवू शकत नाहीत, याचंच प्रत्यक्ष उदाहरण रेणू सिंघी यांनी डोळ्यांसमोर ठेवलं आहे. वय हे अडथळा ठरू शकत नाही हेच त्यांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे अनेकांसाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.

First published:

Tags: Rajasthan