Home /News /national /

देशातील प्रत्येक नागरिकाकडे असेल एकच digital ID, त्यादृष्टीने सरकारचे काम सुरू

देशातील प्रत्येक नागरिकाकडे असेल एकच digital ID, त्यादृष्टीने सरकारचे काम सुरू

सध्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेसंबंधी कामांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड असे वेगवेगळे आयडी कार्डसोबत ठेवावी लागतात. बऱ्याचवेळा यापैकी एखादे कार्ड सोबत नेले नाही, तर अडचणींचा सामना करावा लागतो.

    मुंबई, 31 जानेवारी: आगामी काळात देशातील प्रत्येक व्यक्तीकडे एकच डिजिटल आयडी (Digital ID) असेल. यामध्ये आधार (Aadhaar), पॅन कार्ड (PAN Card), ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसह सर्व कागदपत्रं एकमेकांशी लिंक असतील. याचाच अर्थ तुम्हाला आधार, पॅन किंवा लायसन्सच्या व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळे आयडी देण्याची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. त्यासाठी या मंत्रालयाने “फेडरेटेड डिजिटल आयडेंटिटीज” (Federated Digital Identities) हे नवीन मॉडेल प्रस्तावित केले आहे. हा नवीन डिजिटल आयडी आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच एका युनिक आयडीच्या स्वरूपात असेल. प्रस्तावित मसुद्यानुसार, मंत्रालयाने सुचवले आहे की, ही युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी नागरिकांना त्यांच्याकडे असणारी ओळखपत्रं नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्षम करेल, आणि त्यांना कोणत्या उद्देशासाठी ते वापरायचं आहे, हे निवडण्याचा पर्याय देईल. हा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, त्यावर मंत्रालय 27 फेब्रुवारीपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया मागवणार आहे. WhatsApp वर येणार भन्नाट फीचर, मिळतील 2 नवे टॅब; असा होईल फायदा KYC साठी वापरता येईल या युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी अंतर्गत केंद्रासह विविध राज्यांची ओळखपत्रेही एकत्र ठेवता येतील. अपेक्षेप्रमाणे, हा डिजिटल आयडी केवायसी (KYC) किंवा ई-केवायसी (eKYC) प्रक्रियेसाठी वापरला जाऊ शकतो. हा आयडी ई-केवायसीद्वारे इतर थर्ड पार्टी सुविधांचा लाभ घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो. याशिवाय नागरिकांचे सर्व डिजिटल ओळखपत्र एकमेकांशी लिंक केलं जाऊ शकतं, ज्यामुळे वारंवार व्हेरिफिकेशन प्रक्रियेची गरज पडणार नाही, असंही प्रस्तावात म्हटलं आहे. टेलिशॉपिंग कंपनी Naaptol लवकरच IPO आणणार, 1000 कोटी उभारण्याची कंपनीची योजना 2017 मध्ये केला होता प्लॅन मंत्रालयाने हा प्रस्ताव इंडिया एंटरप्राइज आर्किटेक्चर (IndEA) 2.0 अंतर्गत सादर केला आहे. इंडईएने प्रथम 2017 मध्ये सरकारी संस्थांकडून व्यावसायिक दृष्टिकोनासह आयटी विकास सक्षम करण्यासाठी, प्रस्तावित आणि डिझाइन करण्यात आले होते. नंतर ते अपडेट केले गेले. 2.0 मध्ये, इंडईए (IndEA) एक फ्रेमवर्क प्रस्तावित केले आहे. हे फ्रेमवर्क सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहकांना सर्वसमावेशक आणि एकात्मिक सेवा देण्यासाठी त्यांच्या संस्थात्मक मर्यादेच्या पलीकडे काम करण्यास सक्षम करेल, तसंच आयटी आर्किटेक्चर तयार करण्यास आणि डिझाइन करण्यास सक्षम करतील.' सध्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेसंबंधी कामांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड असे वेगवेगळे आयडी कार्डसोबत ठेवावी लागतात. बऱ्याचवेळा यापैकी एखादे कार्ड सोबत नेले नाही, तर अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी डिजिटल आयडीची योजना नक्कीच फायदेशीर होऊ शकते.
    First published:

    Tags: Aadhar card, Government, Identity verification, Pan card, State government, Tech news, Technology, Verification of mobile phones

    पुढील बातम्या