जाहिरात
मराठी बातम्या / मनी / टेलिशॉपिंग कंपनी Naaptol लवकरच IPO आणणार, 1000 कोटी उभारण्याची कंपनीची योजना

टेलिशॉपिंग कंपनी Naaptol लवकरच IPO आणणार, 1000 कोटी उभारण्याची कंपनीची योजना

टेलिशॉपिंग कंपनी Naaptol लवकरच IPO आणणार, 1000 कोटी उभारण्याची कंपनीची योजना

Naaptol TV हे पहिले प्लॅटफॉर्म आहे ज्यावर प्रोडक्ट शोधले जाऊ शकते. त्याची स्थापना 2008 मध्ये झाली. Naaptol हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड यांसारख्या अनेक भाषांमध्ये टीव्ही चॅनेलद्वारे उत्पादनांची विक्री करते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी : टीव्हीवर चॅनल बदलत असताना तुम्ही Naaptol टीव्हीवर गेला असाल. हीच ऑनलाइन शॉपिंग कंपनी लवकरच आयपीओ (Naaptol IPO) आणण्याची योजना करत आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनी बाजारातून 1,000 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. Naaptol ने मात्र IPO च्या कोणत्याही योजनांवर भाष्य करण्यास नकार दिला. तज्ञांचे म्हणणे आहे की Naaptol च्या IPO मध्ये नवीन इश्यूसह ऑफर फॉर सेल (OFS) असेल. विक्रीच्या ऑफर अंतर्गत, कंपनीचे विद्यमान भागधारक त्यांचे भागभांडवल विकतील, तर फ्रेश इश्यूमधून उभारलेल्या पैशाचा वापर या ऑनलाइन पोर्टलच्या बॅक-एंड आणि टेक्नोलॉजीच्या विकासासाठी केला जाईल. कंपनीला आशा आहे की, टेलिशॉपिंग आणि ई-कॉमर्सचा मेळ घालणारे तिचे सर्वचॅनल प्लॅटफॉर्म इतर ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा वेगळे उभे राहण्यास आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात मदत करेल. असे बोलले जात आहे की ICICI सिक्युरिटीज आणि आनंद राठी इन्व्हेस्टमेंट हे Naaptol च्या IPO साठी बँकर म्हणून काम करत आहेत. BUdget 2022 : बजेटच्या तारखेपासून ते अर्थापर्यंत; बजेटबद्दल लोकांनी गुगलवर सर्च केल्या ‘या’ पाच गोष्टी Naaptol TV हे पहिले प्लॅटफॉर्म आहे ज्यावर प्रोडक्ट शोधले जाऊ शकते. त्याची स्थापना 2008 मध्ये झाली. Naaptol हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड यांसारख्या अनेक भाषांमध्ये टीव्ही चॅनेलद्वारे उत्पादनांची विक्री करते. Naaptol च्या गुंतवणूकदारांमध्ये जपानची Mitsui & Company, JP Morgan आणि वेंचर कॅपिटल इन्वेस्टर न्यू एंटरप्रायझेस असोसिएट्स यांचा समावेश आहे. Naaptol ने 2018 मध्ये या गुंतवणूकदारांकडून 1.5 कोटी डॉलर आणि 2015 मध्ये 5.17 कोटी डॉलर जमा केले. Budget 2022 : मागील वर्षापेक्षा जास्त मोठा असेल अर्थसंकल्प? वाचा किती रुपये वाढवू शकतं सरकार कंपनीचा नफा Naaptol कंपनीचे आर्थिक वर्ष 2021 मध्ये उत्पन्न फ्लॅट होते. 2020 या आर्थिक वर्षात कंपनीला तोटा झाला होता. कंपनीचा एकत्रित महसूल आर्थिक वर्ष 2020 मध्ये 318.87 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये 321.22 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीला 51.84 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीला 3.42 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात