मराठी बातम्या /बातम्या /देश /

Goa Election 2022: मोफत वीज-पाणी आणि शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये; केजरीवालांनी केली मोठी घोषणा

Goa Election 2022: मोफत वीज-पाणी आणि शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये; केजरीवालांनी केली मोठी घोषणा

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

पणजी, 16 जानेवारी : पाच राज्यांच्या निवडणुकांची (5 states assembly election 2022) रणधुमाळी सुरू झाली असून गोव्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आपल्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यात व्यस्त असताना आम आदमी पक्षाचे नेते (Aam Aadmi Party) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejariwal) यांनी रविवारी गोव्यातील जनतेसाठी अनेक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा अजेडा जाहीर केला असून सत्तेत आल्यास गोव्यातील जनतेला मोफत वीज-पाणी पुरवठा करण्यासोबतच इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले, गोव्यातील जनता कंटाळली आहे. गोव्यातील नागरिकांना आता बदल हवा आहे. त्यांच्यासाठी आपण एक नवी आशा आहोत. यापूर्वी त्यांच्याकडे भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त इतर पर्यायच उपलब्ध नव्हता. पण आता त्यांना बदल हवा आहे. असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी 13 कलमी अजेंडा निश्चित करुन जाहीर केला आहे.

वाचा : युपीत भाजपचा मोठा डाव! 60% ओबीसी-दलित उमेदवार

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात मोहल्ला क्लिनिक आणि रुग्णालये सुरू करण्यात येतील. इतकेच नाही तर राज्यातील जनतेला वीज आणि पाणी पुरवठा मोफत दिला जाईल. तसेच सरकारी शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाईल.

अरविंद केजरीवाल म्हणाले, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला मदत म्हणून 1000 रुपये दिले जातील. त्याचबरोबर राज्यातील पर्यटन क्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधारे उन्नत करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यांची स्थिती सुधारली जाईल. शेतकरी वर्गासोबत बोलून त्यांच्या समस्या सोडवल्या जातील.

वाचा : उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी भाजपची मोठी रणनिती, पहिल्या यादीत 63 आमदारांना पुन्हा संधी तर 20 आमदारांचा पत्ता कट

तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल. ज्या तरुणांना रोजगार मिळू शकणार नाही त्यांना दरमहा 3 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर खाणकामाबाबत त्यांनी म्हटलं, सत्तेत आल्यावर 6 महिन्यांत जमिनीचे हक्क दिले जातील.

डोअर-टू-डोअर प्रचार

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी दोन दिवसीय दौऱ्यावर गोव्यात दाखल झाले. केजरीवाल यांनी सांतआंद्रे आणि शिरोडा मतदारसंघातून पक्षाच्या 'डोअर टू डोअर' प्रचाराला सुरुवात केली. केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांनाही "लोकांची सेवा करण्याची संधी" म्हणून निवडणूक प्रचार घेण्याचे आवाहन केले.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, आप 'भ्रष्ट पक्ष' उखडून टाकण्यासाठी आणि 'प्रामाणिक पक्ष' स्थापित करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. दरम्यान आम आदमी पक्षाने पाच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. आप ने आपली पहिली यादी जाहीर केली होती, आप ने गोवा विधानसभेच्या 40 पैकी 25 उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत. वाल्मिकी नाईक पणजीमधून, सुरेल तिळवे फोंडामधून, गुरुदास येसू नाईक हे माडकईममधून, पुंडलिक धारगळकर हे पेडणेमधून आणि विष्णू नाईक हे शिवोली मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत.

First published:

Tags: AAP, Arvind kejriwal, Election, Goa