मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Chunav: युपीत भाजपचा मोठा डाव! 60% ओबीसी-दलित उमेदवार, कोणत्या जातीला किती तिकिटं, कसं आहे जातीय समीकरण?

UP Chunav: युपीत भाजपचा मोठा डाव! 60% ओबीसी-दलित उमेदवार, कोणत्या जातीला किती तिकिटं, कसं आहे जातीय समीकरण?

Yogi Adityanath

Yogi Adityanath

UP Chunav 2022: भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) उमेदवारांची पहिली यादी (bjp candidates list) जाहीर केली आहे. यूपी निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या या यादीत भाजपने 107 जणांना तिकिटे दिली आहेत. यूपी निवडणुकीसाठी भाजपने ओबीसी, दलित आणि महिला उमेदवारांना 68 टक्के तिकिटे दिली आहेत. भाजपने या यादीत जातीय समीकरणांची पूर्ण काळजी घेतली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

लखनौ, 15 जानेवारी : उत्तर प्रदेश निवडणुका Uttar Pradesh Assembly Election 2022) तोंडावर आलेल्या असताना भाजपला मोठं खिंडार पडलंय. अशा स्थितीत भाजपने आता जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी उमेदवारांची पहिली यादी (bjp candidates list) जाहीर केली आहे. यूपी निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या या यादीत (UP Election bjp candidates list) भाजपने 107 जणांना तिकिटे दिली आहेत. यूपी निवडणुकीसाठी भाजपने ओबीसी, दलित आणि महिला उमेदवारांना 68 टक्के तिकिटे दिली आहेत. एवढेच नाही तर भाजपने सर्वसाधारण जागेवर दलित उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपच्या उमेदवारांची ही यादी पाहता उत्तर प्रदेशात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता तिकीट वाटपाबाबत बरेच विचारमंथन झाले असून जातीय समीकरणे लक्षात घेऊनच तिकीट वाटप करण्यात आले आहे.

भाजपने पहिल्या यादीत (BJP Full Candidate List) 107 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत, ज्यामध्ये 83 विद्यमान आमदारांपैकी 63 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर 20 उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. यात 107 उमेदवारांपैकी 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिला उमेदवार आहेत. त्याचवेळी 43 जागांवर सर्वसाधारण प्रवर्गाचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. याशिवाय एका सर्वसाधारण जागेवरून 1 अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे.

BJP Candidate List 2022 For UP: चला तर मग जाणून घेऊया भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीत कोणत्या जातीतील किती लोकांना तिकीट देण्यात आले आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत सर्वसाधारण गटासाठी 43 तिकिटे

ठाकुर -18

ब्राह्मण – 10

वैश्य    - 08

पंजाबी – 03

त्यागी  – 02

कायस्थ - 02

UP Election 2022: उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी भाजपची मोठी रणनिती, पहिल्या यादीत 63 आमदारांना पुन्हा संधी तर 20 आमदारांचा पत्ता कट

ओबीसी प्रतिनिधीत्व - 44

जाट -16

गुर्जर - 7

लोधी - 6

सैनी – 5

साक्य - 2

कश्यप – 1

खडागबंशी - 1

मौर्य - 1

कुर्मी - 1

कुशवाह - 1

निषाद – 1

प्रजापति

यादव

योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ जाहीर

अनुसूचित जातीचे प्रतिनिधीत्व - 19

जाटव- 13

वाल्मिकी - 2

बंजारा - 1

धोबी - 1

पासी - 1

सोनकर - 1

उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्याची सुरुवात 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदानाने होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला राज्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी 20 फ्रेबुवारीला, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी 27 फेब्रुवारीला, पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी 7 मार्चला मतदान होणार आहे.

First published:

Tags: Election commission, Uttar pardesh