नवी दिल्ली, 15 जानेवारी : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election 2022) साठी भारतीय जनता पक्षाने एकूण 105 उमेदवारांची यादी जाहीर (BJP announced 105 candidates list) केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची या यादीत नावे आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील 48 तर दुसऱ्या टप्प्यातील 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यासोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
20 आमदारांचा यादीतून पत्ता कट
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या दोन टप्प्यांतील उमेदवारांच्या यादीतून विद्यमान 20 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या दोन टप्प्यांसाठी भाजपने 83 जागांपैकी 63 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर 20 आमदारांची तिकीटे कापली आहेत.
10 seats for women, 44 seats for OBC candidates and 19 seats for SC, in upcoming assembly polls: BJP pic.twitter.com/3S7OtIQjhB
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 15, 2022
धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं, 20 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सरधना येथून संगीत सोम यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मीरापूर येथून प्रशांत गुर्जर, सिवालखास येथून मनेंद्र पाल सिंह, हस्तिनापूर येथून दिनेश खटीक, मेरठ कँटमधून अमित अग्रवाल, बडौद येथून केपी सिंह मलिक यांना, किठोर येथून सत्यवीर त्यागी, मेरठमधून कमलदत शर्मा, दक्षिण मेरठमधून सोमेंदर तोमर, छपरउली येथून सहेंद्र सिंह रमाला, शामली येथून तजेंद्र सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ जाहीर
उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. आदित्यनाथ त्यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. अयोध्या, देवबंदसह अनेक ठिकाणांहून ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा गोरखपूरमधूनच योगी आदित्यनाथ यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
पहिल्या टप्पा - 10 फेब्रुवारीला मतदान
दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी
तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी
चौथा टप्पा -23 फेब्रुवारी
पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी
सहावा टप्पा - 3 मार्च
सातवा टप्पा -7 मार्च
निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका, योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा
पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी
पाच राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहे, त्या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा 14 मे रोजी समाप्त होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहे. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेसाठी 70 जागा आहे. उत्ताराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. गोवा विधानसभेसाठी एकूण 40 जागा आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तर मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी समाप्त होणार आहे. मणिपूरमध्ये एकूण 60 जागा आहे. एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, BJP, UP Election, Uttar pradesh