पणजी 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Assembly Election 2022) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलं. मात्र सध्या समोर येत असलेल्या आकडेवारीवरुन भाजपला स्पष्ट बहुमत दिसत आहे. दुसरीकडे सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर असल्याचं दिसत होतं. त्यामुळे भाजपची चिंता वाढली होती. मात्र आता प्रमोद सावंत साखळी मतदारसंघात विजयी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे (Goa CM Pramod Sawant Wins in Sanquelim), त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे.
उत्पल पर्रीकरांचा पराभव; केंद्रातून बाहेर पडताच भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया
गोव्यातील साखळी मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात चुरशीची लढत होती. अशात आता या मतदारसंघात प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाल्याचं समोर आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा पराभव झाला आहे.

)







