Home /News /national /

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन, 'एम्स'मध्ये घेतला अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन, 'एम्स'मध्ये घेतला अखेरचा श्वास

रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

    पाटणा, 13 सप्टेंबर: माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंह  (raghuwansh Prasad Singh) यांचं रविवारी निधन झालं. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ते निकटवर्तीय होते. बिहारच्या राजकारणात रघुवंश बाबू अशी त्यांची ओळख होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर रघुवंश प्रसाद सिंह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हेही वाचा...'ठाकरे ब्रँड'वर नितेश राणेंचं सडेतोड उत्तर, 'छत्रपती शिवाजी महाराजां'वरुन ट्वीट रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, 'आधी लवकर बरे व्हा, बसून चर्चा करू', असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं. रघुवंश प्रसाद सिंह यांचे विश्वासू केदार यादव यांनी News 18 शी बोलताना सांगितलं होतं की, रघुवंश यांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री 11 वाजून 56 मिनिटांला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच रघुवंश यांनी अखेरचा श्वास घेतला. राजदमध्ये नाराज होते रघुवंश प्रसाद सिंह... माजी खासदार पूर्व सांसद रामा सिंह हे राजदच्या गोटात सहभागी होत असल्याच्या चर्चेनंतर रघुवंश प्रसाद सिंह नाराज झाले होते. त्यांनी 23 जून रोजी राजदच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. नंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना पाटणा येथील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रामा सिंह यांनी रामविलास पासवान यांचा पक्ष लोक जनता पार्टीकरून 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. रामा सिंह यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांचा वैशाली लोकसभा मतदार संघात पराभव केला होता. हेही वाचा...धक्कादायक! NEET परीक्षेआधी तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या लालूंना लिहिलं होतं पत्र.... दिल्ली एम्समध्ये दाखल झाल्यानंतर रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र सोशल मीडियातही व्हायरल झालं होतं. 'मी जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर 32 वर्षोंपासून आपल्यासोबत होतो. पण आता नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेने मला मोठा स्नेह दिला. मला क्षमा करावे', असं रघुवंश प्रसाद सिंह यांनी पत्रात म्हटलं होतं. 'आधी आपण  लवकर बरे व्हा, बसून चर्चा करू', असं लालू प्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद यांच्या पत्राला उत्तर दिलं होतं.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Patna, RJD, RJD chief, Rjd chief lalu yadav

    पुढील बातम्या